Jayant Patil: भाजपसह शिंदे आणि अजित पवार गट देवेंद्र फडणवीस चालवत आहेत, जयंत पाटील यांचा आरोप

Jayant Patil On Devendra Fadnavis: राज्यातले तिन्ही (भाजप, शिंदे आणि अजित पवार गट) पक्ष देवेंद्र फडणवीस चालवत आहेत, असा आरोप शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे.
भाजपसह शिंदे आणि अजित पवार गट देवेंद्र फडणवीस चालवत आहेत, जयंत पाटील यांचा आरोप
Jayant Patil On Devendra Fadnavissaam tv
Published On

>> रणजीत माजगावकर

Jayant Patil On Devendra Fadnavis:

राज्यातले तिन्ही (भाजप, शिंदे आणि अजित पवार गट) पक्ष देवेंद्र फडणवीस चालवत आहेत, असा आरोप शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. कोल्हापुरात महाविकास आघाडीच्या वतीने आयोजित केलेल्या वज्रमूठ सभेत जयंत पाटील असं म्हणाले आहेत.

यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर ही टीका केली आहे. ते म्हणाले आहेत की, ''अडवाणी साहेबांना पुरस्कार द्यायला ते गेले आणि पुरस्कार देत असताना महामहीम राष्ट्रपती यांना उभं करून बाकीचे सर्व खाली बसले.'' ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

भाजपसह शिंदे आणि अजित पवार गट देवेंद्र फडणवीस चालवत आहेत, जयंत पाटील यांचा आरोप
MNS News: मनसे महायुतीत सहभागी होणार का? शर्मिला ठाकरे यांचं नाव घेत राजू पाटील म्हणाले...

ते म्हणाले, ''या राज्यातील लहान लहान पक्ष टिकले नाही पाहिजेत, म्हणून या राज्यातले दोन पक्ष फोडण्याचे पाप या सरकारने (मोदी सरकारने) केलं. 105 आमदार असणाऱ्यांना स्वस्त बसावं लागलं आणि या दोन्ही पक्षातून फुटून गेलेल्यांना मंत्रिमंडळात बसायची संधी मिळालेली आहे.'' (Latest Marathi News)

इतर पक्षातून भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरु आहे. यावरच भाष्य करताना जयंत पाटील म्हणाले, ''प्रत्येकावर आरोप आहेत, तरीही मांडीला मांडी लावून बसायला यातल्या कुणालाही लाज वाटत नाही. ही भारतीय जनता पक्षाची आजची नीती आहे, हे विसरू नका. भ्रष्ट मार्गाने काहीही करा पण सत्तेत बसा, तुम्हाला पाहिजेल ते करा.''

भाजपसह शिंदे आणि अजित पवार गट देवेंद्र फडणवीस चालवत आहेत, जयंत पाटील यांचा आरोप
Mark Zuckerberg: इलॉन मास्कला मार्क झुकेरबर्गने सोडलं मागे, बनला जगातील तिसरा सर्वात श्रीमंत व्यक्ती; संपत्तीत विक्रमी वाढ

राज्यातील महायुतीच्या जागावाटपावर बोलताना ते म्हणाले, ''आज जागावाटप करताना मोठी पंचायत व्हायला लागली आहे. मुख्यमंत्र्यांच्या मुलाची घोषणा मुख्यमंत्र्यांनी करायला पाहिजे होती. मात्र देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पक्षाची घोषणा केली. तिन्ही पक्ष देवेंद्र फडणवीस चालवत आहेत. शिवसेना एकनाथ शिंदे यांच्याकडून कोणी उभं राहायचं. राष्ट्रवादीकडून कोणी उभं राहायचं. कोणी कुठल्या पक्षात जाऊन उमेदवारी घ्यायची, हे ते ठरवतात.''

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com