MNS News: मनसे महायुतीत सहभागी होणार का? शर्मिला ठाकरे यांचं नाव घेत राजू पाटील म्हणाले...

Raju Patil News: नऊ तारखेला गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे काय भूमिका मांडणार या प्रश्नावर राजू पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
Raju Patil
Raju Patil Saam Tv

>> अभिजित देशमुख, कल्याण

Raju Patil On Raj Thackeray:

''राज ठाकरे काय बोलतील हे आमच्या शर्मिला वहिनी देखील सांगू शकत नाही, त्यामुळे आम्ही काय सांगणार, अशी प्रतिक्रिया मनसे आमदार राजू पाटील यांनी दिली. मनसे महायुतीत सहभागी होणार का? नऊ तारखेला गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे काय भूमिका मांडणार या प्रश्नावर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

यावेळी बोलताना आमदार पाटील यांना जे काही बोलायचं ते नऊ तारखेला बोलतील आणि ते महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या हिताचं बोलतील असा विश्वास व्यक्त केला. आमच्या पक्षाशी गद्दारी केली त्यांना मदत करणार नाही, असे सांगत नाव न घेता ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांना त्यांनी लक्ष केलं आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Raju Patil
Mark Zuckerberg: इलॉन मास्कला मार्क झुकेरबर्गने सोडलं मागे, बनला जगातील तिसरा सर्वात श्रीमंत व्यक्ती; संपत्तीत विक्रमी वाढ

नऊ तारखेला होणाऱ्या गुढीपाडव्याच्या सभेसाठी मनसेकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. आज याच पार्श्वभूमीवर मनसेकडून भव्य बाईक रॅलीचं आयोजन देखील करण्यात आलं होतं. मनसे आमदार राजू पाटील यांच्या कार्यालयात आज उल्हासनगर बदलापूर अंबरनाथ कल्याण ग्रामीण मधील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. (Latest Marathi News)

Raju Patil
PM मोदींच्या रोड शोदरम्यान स्टेज कोसळला, एकमेकांवर पडले कार्यकर्ते; VIDEO

याचदरम्यान बोलताना मनसे आमदार राजू पाटील यांनी आगामी निवडणुकीसाठी राज ठाकरे यांच्या आदेश काय आहेत, त्यासाठी सगळेच तयार आहोत. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. 2019 मध्ये राज ठाकरेंनी 30 दिवसआधी विधानसभा लढवण्यास सांगितले होते. मी स्वतः लोकसभा 2014 ला लढलो. त्यामुळे इथली लोकसभा क्षेत्राची बांधणी कशी करायची, हे सगळं आम्हाला माहिती आहे. यावेळेस पण आदेश दिला तर तयार आहोत, असे ते म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com