Sujay Vikhe Patil : किती घालायच्या तेवढ्या गोळ्या घाला, मागे हटणार नाही; जीवे मारण्याच्या धमकीवर सुजय विखेंची प्रतिक्रिया

Sujay Vikhe Patil Threatened: लोकसभा निवडणूकीचा प्रचार सुरू असतानाच सुजय विखे पाटील यांना जिवे मारण्याच्या धमकीची एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.

Sujay Vikhe Patil
Sujay Vikhe Patil Saam Tv

सिद्धेश म्हात्रे साम टीव्ही

Maharashtra Politics Sujay Vikhe News

सुजय विखे पाटील (Sujay Vikhe) यांना गोळ्या घालून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा एक ऑडिओ क्लिप कामोठेतील सभेत लावण्यात आली आहे. या क्लिपमधील शिव्या देणारी व्यक्ती माजी पंचायत समिती सदस्य (Maharashtra Politics) तथा निलेश लंके प्रतिष्ठान मीडिया सेलचा अध्यक्ष असल्याचा दावा करण्यात आला आहे. ज्याला शिव्या दिल्या तो पारनेरच्या कळस ग्रामपंचायतीचा माजी उपसरपंच असल्याचा दावा करण्यात आला आला आहे. (Maharashtra Lok sabha Election)

लोकसभा निवडणूकीचा प्रचार सुरू असतानाच अहमदनगर जिल्ह्यातील भाजपचे खासदार आणि उमेदवार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांना जिवे मारण्याच्या धमकीची एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाला (Maharashtra Politics Sujay Vikhe News) आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. या क्लिरपमध्ये सुजय विखे पाटील यांना गोळ्या घालून ठार मारेल, अशी धमकी दिल्याचं स्पष्ट होत आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सुजय विखे पाटील यांनी ऑडिओ क्लिपवर काय म्हटलं?

पारनेरच्या गोरगरीब जनतेने या आधी दहशदीत आयुष्य जगलं. मात्र, आता तुम्हाला दहशदीत जगू देणार नाही. पारनेर आणि अहिल्यादेवी नगरच्या जनतेला दहशदीच्या वातावरणातून बाहेर काढण्यासाठी मी लोकसभेत जात (Sujay Vikhe Patil Threatened) असल्याचं सुजय विखे पाटलांनी पनवेल येथे पार पडलेल्या सभेत (Kamothe Sabha) सांगितलं.

यावेळी व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपबाबत बोलताना किती गोळ्या घालायच्या, तेवढ्या घाला. मात्र, सुजय विखे पाटील मागे हटणार नाही. 4 जूनला सुजय विखे पाटील समोरच्या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त करणार, हे स्टॅम्प पेपरवर लिहून घ्या अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली (Lok Sabha 2024) आहे.


Sujay Vikhe Patil
Political News : महायुतीच्या मेळाव्याला भाजपच्या कोल्हेंची गैरहजेरी; विखेंसोबत एकाच मंचावर येण्याचे टाळले

निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय समर्थक आणि उमेदवार एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. सगळीकडे उमेदवारांच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे, अशातच सुजय विखे यांना जीवे मारण्याची धमकी देणारी व्हिडिओ क्लिप (Lok Sabha) व्हायरल झाल्यामुळे चांगलीच खळबळ उडाली होती. परंतु काहीही झालं तरी मी मागे हटणार नाही, अशी भूमिका सुजय विखे पाटील यांनी या क्लिपवर स्पष्ट केली आहे.


Sujay Vikhe Patil
Amravati Politcs : नवनीत राणा भाजपमध्ये प्रवेश करणार?, कमळ चिन्हावर निवडणूक लढणार?; सूत्रांची माहिती

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com