Badlapur Crime News: बदलापुरात चोरीच्या घटना वाढल्या; व्यावसायिक जाहिरातीच्या 2 सायकल चोरट्यांकडून लंपास

Badlapur Crime News in Marathi: बदलापुरात व्यावसायिक जाहिरातीच्या दोन सायकल चोरीला गेल्याची घटना घडली आहे. बदलापूरच्या बेलवली भागात ही घटना घडली आहे. या प्रकरणी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्या आला आहे.
Crime News
Crime NewsSaam Digital
Published On

अजय दुधाणे, बदलापूर

Badlapur latest News:

बदलापुरात एक चोरीची घटना उघडकीस आली आहे. बदलापुरात व्यावसायिक जाहिरातीच्या दोन सायकल चोरीला गेल्याची घटना घडली आहे. बदलापूरच्या बेलवली भागात ही घटना घडली आहे. या प्रकरणी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्या आला आहे. (Latest Marathi News)

बदलापूरच्या बेलवली परिसरातून व्यावसायिक जाहिरातीच्या दोन सायकल चोरीला गेल्याची घटना घडली. चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. दोन अज्ञात चोरट्यांविरोधात बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बदलापूरच्या बेलवली परिसरातून व्यावसायिक जाहिरातीच्या दोन सायकल चोरीला गेल्याची घटना घडली. चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. दोन अज्ञात चोरट्यांविरोधात बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Crime News
Nanded Crime News : पोलिसांवर तलवार उगारताच त्याच्यावर झाला बेछूट गाेळीबार, वाचा नांदेड शहरातील थरारक घटना

सायकल चोरी कशी झाली?

बदलापूरच्या बेलवली परिसरातील वॉटर सप्लाय समोर मेघनिनाद सोसायटी आहे. या सोसायटी समोरील फुटपाथवर लॉक करून ठेवलेल्या तीन चाकी व्यावसायिक जाहिरातीच्या दोन सायकल चोरट्यांनी लंपास केल्या आहेत. सायकल चोरीच्या घटना बदलापुरात वाढल्या आहेत.

गेल्या आठवड्यातच बदलापूर पश्चिम पोलिसांनी जवळपास 15 नागरिकांना त्यांच्या सायकल शोधून दिल्या आहेत. मात्र त्यानंतरही सायकल चोरीच्या घटना घडत असल्यानं पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांमधून केली जातेय.

Crime News
Nashik Crime News: धक्कादायक! दारू पिल्याने ओरडा मिळाला; संतापलेल्या भाच्याने मामाला कायमचं संपवलं

लोणावळ्याच्या लायन्स पॉईंटवर हुक्का विक्री करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल

लोणावळ्यातील लायन्स पॉईंटवर हुक्का विक्री करण्यास किंवा पिण्यास बंदी असतानाही खुलेआम हुक्का विक्री करीत असलेल्या अशा दोन जणांवर लोणावळा पोलिसांनी गुन्हा दखल केला आहे. संतोश शंकर आखाडे आणि दिपक भागु हिरवे असे गुन्हा दखल करणाऱ्या व्यक्तींची नावे आहेत.

रात्री उशिरापर्यंत दुकाने खुली ठेवणाऱ्या सह जणांवर देखील खटले दाखल करण्यात आले आहेत. हुल्लडबाजी करणाऱ्या तीन पर्यटकांवर देखील कारवाई करण्यात आली आहे. सतरा डिसेंबर रोजी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती लोणावळा उप विभागीय पोलीस अधिकारी सत्यसाई कार्तिक यांनी दिली आहे.

आरोपींकडून सात हुक्का पॉट, प्लास्टिक फिल्टर आणि फ्लेवर मिंट असा चौदा हजार 650 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास लोणावळा पोलीस करीत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com