Crime News: अकोल्यात रक्तरंजित थरार! मुलाला मारताना रोखलं, रागाच्या भरात नवऱ्याने बायकोलाच संपवलं

Akola crime update: अकोल्यात कौटुंबिक वादातून पतीने पत्नीवर चाकूने हल्ला केल्याची घटना घडली. गंभीर जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू झाला. आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.
 Crime News
Crime NewsSaam TV
Published On

अकोल्यातून एक थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. या घटनेमुळे अकोल्यातील परिसर हादरला आहे. कौटुंबिक वादातून पतीनेच पत्नीची निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आलीये. या प्रकरणात वृषाली निंबोकार असं मृत महिलेचं नाव असून अनिल निंबोकार असं आरोपी पतीचे नाव आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

समोर आलेल्या माहितीनुसार, ही घटना गुरुवारी सकाळच्या सुमारास घडलीये. आरोपी अनिल निंबोकार हा त्यांच्या ८ वर्षांच्या मुलाला मारहाण करत होता. मुलाला वाचवण्यासाठी त्याची आई वृषाली मध्ये पडली. मात्र याच वेळी अनिलचा राग अनावर झाला आणि त्याने हातातील धारदार चाकूने वृषालीच्या पोटात वार केला. या हल्ल्यामध्ये वृषाली गंभीर जखमी झाली.

 Crime News
Crime News: लग्नानंतर पहिल्या रात्री बायकोला कुशीत घेताच बसला धक्का; नवरा थेट पोहोचला पोलीस स्टेशनमध्ये

तातडीने पत्नीला केलं रूग्णालयात दाखल

घटनेनंतर आरोपीने स्वतः जखमी पत्नीला तातडीने रुग्णालयात दाखल केलं. परंतु डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर वृषालीला मृत घोषित केलं. या घटनेनंतर आरोपी अनिल निंबोकार स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाला. सध्या त्याला अकोला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात ठेवण्यात आलं असून पुढील चौकशी सुरू आहे.

या घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. विशेष म्हणजे, या घटनेत दोन लहान मुलांचे आई-वडिलांचं छत्र हरवलंय. आईचा मृत्यू झाला असून वडील पोलिसांच्या ताब्यात असल्याने मुलांचे भविष्य अनिश्चित झालंय. या घटनेमुळे सर्वांकडून हळहळ व्यक्त केली जातेय.

 Crime News
Gold smuggling : प्रायव्हेट पार्टमध्ये लपवून आणलं ५ कोटींचं सोनं; विमानतळावर सोन्याची मोठी तस्करी उघड, ५ जणांना अटक

प्राथमिक तपासात कौटुंबिक वादातून ही घटना घडल्याचं समोर येतंय. पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून नेमकं कारण काय याचा शोध घेतला जात आहे. आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणीही स्थानिकांकडून केली जातेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com