Gold smuggling : प्रायव्हेट पार्टमध्ये लपवून आणलं ५ कोटींचं सोनं; विमानतळावर सोन्याची मोठी तस्करी उघड, ५ जणांना अटक

Gold seizure news: बेंगळूरू विमानतळावर डीआरआयने मोठी कारवाई करत ५ कोटी रुपयांचे सोनं जप्त केले आहे. पाच आरोपींना अटक करण्यात आली असून कॅप्सूल आणि पेस्टमध्ये लपवून तस्करी केल्याचा संशय आहे. प्रकरणाचा तपास सुरू आहे.
Gold smuggling
Gold smugglingSAAM TV
Published On

बेंगळूरू विमानतळावर पुन्हा एकदा सोन्याच्या तस्करीचा मोठा पर्दाफाश झाला आहे. या कारवाईमुळे सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्याचं दिसून येतंय. कर्नाटकची राजधानी बेंगळुरूमधील केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयाने मोठी कारवाई करत पाच जणांना अटक केलीये. या आरोपींकडून तब्बल ५ कोटी रुपयांचं सोनं जप्त करण्यात आलं आहे.

ही कारवाई केली असता सोनं कॅप्सूल आणि बिस्किटांच्या स्वरूपात सापडलं आहे. यावेळी धक्कादायक बाब म्हणजे ते अतिशय धक्कादायक पद्धतीने प्रायव्हेट पार्टमध्ये लपवण्यात आलं होतं.

Gold smuggling
Crime News: 16 व्या मजल्यावरून तरूणी पडली; रक्ताच्या थारोळ्यात पडला निर्वस्त्र मृतदेह, कुटुंबियांकडून हत्येचा आरोप

पेस्ट आणि कॅप्सूलमध्ये लपवलेलं सोनं

तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी हे सोनं वेगवेगळ्या स्वरूपात आणलं होतं. यामध्ये कॅप्सूल आणि पेस्टमध्ये लपवून भारतात आणलं होतं. बांग्लादेशमार्गे ही तस्करी करण्यात आली असल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय. विमानतळावरील तपासणीतून सोनं सापडू नये यासाठी त्यांनी प्रायव्हेट पार्ट्समध्ये देखील सोनं लपवलं होतं.

Gold smuggling
Doctor death case: डॉक्टर मैत्रिणीला भेटायला रात्री फ्लॅटवर गेला, बाथरूममध्ये बेशुद्धावस्थेत सापडला; तरुण डॉक्टरचा मृत्यू, हातावरील एका खूणेने संशय वाढला

मोठ्या रॅकेटच्या संशयाने तपास सुरू

या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या पाचही आरोपींना ताब्यात घेण्यात आलं आहे. यावेळी त्यांच्याद्वारे आणखी मोठं जाळं कार्यरत असल्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केलीये. या तस्करीच्या साखळीचा उलगडा करण्यासाठी DRI आणि पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. यापूर्वीही या विमानतळावर सोन्याच्या तस्करीचे अनेक प्रकार उघड झाले आहेत.

Gold smuggling
Crime news: घरचे बाहेर गेले असताना घरात घुसला अन्..; शेजारी राहणाऱ्या तरूणाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, राज्यात खळबळ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com