Crime: इंटिरियर डिझायनिंगच्या विद्यार्थिनीवर बलात्कार, सुरक्षारक्षकाने ओलीस ठेवत केलं भयंकर कृत्य

Ahmedabad Crime News: गुजरातच्या अहमदाबादमध्ये विद्यार्थिनीवर बलात्कार करण्यात आला. सुरक्षारकाने ओलिस ठेवत तिच्यासोबत भयंकर कृत्य केले.
Crime: इंटिरियर डिझायनिंगच्या विद्यार्थिनीवर बलात्कार, सुरक्षारक्षकाने ओलीस ठेवत केलं भयंकर कृत्य
Ahmedabad Crime Newssaam tv
Published On
  • अहमदाबादमध्ये इंटिरियर डिझायनिंगच्या विद्यार्थिनीवर बलात्कार

  • अहमदाबादमध्ये सुरक्षारक्षकाने विद्यार्थिनीला ओलीस ठेवले

  • पीजीच्या छतावर विद्यार्थिनीवर बलात्कार केला

  • आरोपी सुरक्षारक्षकाला अटक

अहमदाबादमध्ये इंटिरियर डिझायनिंगच्या विद्यार्थिनीवर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीजीमध्ये राहणाऱ्या या विद्यार्थिनीला सुरक्षारक्षकाने छतावर ओलीस ठेवत तिच्यासोबत भयंकर कृत्य केले. पीडितेला एकटं पाहून आरोपीने तिच्यावर बलात्कार केला. या घटनेप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत अवघ्या काही तासांत त्याला अटक केली. पीडितेवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित विद्यार्थिनी रात्री १० वाजताच्या सुमारास इमारतीच्या छतावर फिरायला गेली होती. त्यावेळी सुरक्षारक्षक धरम सिंग तिथे आला. त्याला पाहून पीडितेने पळण्याचा प्रयत्न केला. पण त्याने तिला अडवत पकडले आणि तिच्या गळ्याभोवती वायर गुंडाळली. त्यानंतर त्याने तिला बंधक बनवून तिच्यावर बलात्कार केला. या घटनेनंतर आरोपी फरार झाला.

Crime: इंटिरियर डिझायनिंगच्या विद्यार्थिनीवर बलात्कार, सुरक्षारक्षकाने ओलीस ठेवत केलं भयंकर कृत्य
Thane Crime: गर्लफ्रेंडला घेऊन लॉजवर गेला, भांडणानंतर राग डोक्यात गेला; हत्या करून तरुणाने पळ काढला

पीडित विद्यार्थिनीची प्रकृती खालावल्यानंतर तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच आनंद नगर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी या प्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत त्याचा शोध घेण्यासाठी १० टीम तयार केल्या. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपीचा शोध घेतला. आरोपी लिफ्टमधून छतावर जात असतानाचे सीसीटीव्ही समोर आले आहेत.

Crime: इंटिरियर डिझायनिंगच्या विद्यार्थिनीवर बलात्कार, सुरक्षारक्षकाने ओलीस ठेवत केलं भयंकर कृत्य
Kalyan Crime: कल्याण हादरले! डोक्यावर वार करत तरुणीने बॉयफ्रेंडला संपवलं, मृतदेह गोणीत भरून २४ तास पाण्यात ठेवला

आरोपी मूळचा उत्तर प्रदेशच्या हरदोई जिल्ह्यातील आहे. तो गुजरातमधील एका पीजीमध्ये सुरक्षारक्षक म्हणून काम करत होता. घटनेनंतर फरार झालेल्या आरोपीला पोलिसांनी अवघ्या काही तासांत अटक केली. त्याची सध्या चौकशी केली जात आहे. या घटनेमुळे गुजरातमध्ये खळबळ उडाली आहे. पोलिस सध्या या घटनेचा तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com