लोणीकंद गोळीबार प्रकरण; व्यवसायिकाला लुटणाऱ्या तीन दरोडेखोरांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Lonikand Businessman Shot and Robbed: ई-चलनाच्या मदतीने पुणे पोलिसांनी तीन दरोडेखोरांना पकडण्यात यश मिळवलंय. या तिघांनी पुण्यातील लोणीकंद येथे एका व्यावसिकावर गोळीबार केला होता.
Lonikand Businessman Shot and Robbed
Three robbery suspects arrested by Pune Police in the Lonikand firing and gold robbery case saam tv
Published On

सचिन जाधव, साम प्रतिनिधी

पुण्याच्या लोणीकंदमधील गोळीबार प्रकरणी पोलिसांना मोठं यश मिळालंय. व्यावसायिकावर गोळीबार करून त्याच्याकडील २२ तोळ्यांचे दागिने लुटून पसार झालेल्या दरोडेखोरांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. या तिघा दरोडेखोरांना मध्य प्रदेशातील उज्जैन परिसरातून अटक करण्यात आली आहे. गोळीबार करत लुटण्यात आल्याने एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी लोणीकंद पोलिस ठाण्यात तिघा आरोपींच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. अखेर पुणे पोलिसांन या आरोपींना अटक केली आहे.

Lonikand Businessman Shot and Robbed
Cyber Crime News : Telegram Task Scamचा पर्दाफाश; कोट्यवधींची सायबर फसवणूक, खार पोलिसांची मोठी कारवाई

आरोपींकडून देशी बनावटीची तीन पिस्तुले, सोन्याचे दागिने असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.दरोडेखोरांविरुद्ध उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, नेपाळमध्ये खून, खुनाचा प्रयत्न, लूटमार असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. या दरोडेखोरांकडून मध्यप्रदेश पोलिसांच्या मदतीने उज्जैन येथून पकडले असून गुन्ह्यात वापरलेल तीन गावठी पिस्तूले, हिसकावलेले सोन्याचे दागिणे देखील त्यांच्याकडून जप्त करण्यात आले आहेत. अविनाश श्रीकृष्णचंद्र त्रिपाठी, मोहम्मद वसीम शोएब,सुरेंद्र रामचंद्र पाल अशी तिघा दरोडेखोरांची नावे आहेत.

Lonikand Businessman Shot and Robbed
धिंड आरोपींची, कारवाई पोलिसांवर; मानवाधिकार आयोगाच्या निर्णयावर पुणेकर संतप्त

त्रिपाठी हा यातील मुख्य आरोपी असून,त्याच्या एकट्यावर तब्बल तेरा गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. उत्तरप्रदेश पोलिसांनी त्याच्या एन्काऊंटरची ऑर्डर काढली होती. त्याने उत्तरप्रदेश पोलिसांच्या एसटीएफ पथकावर देखील गोळीबार केला होता. तेव्हा पासून तो फरार आहे.अविनाश त्रिपाठी आणि त्याच्या साथीदारांनी बुधवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास गावडेवाडी, शिरसवाडी परिसरात व्यवसायिक संतोष गावडे यांच्यावर गोळीबार करून त्यांच्या गळ्यातील 22 तोळे वजनाच्या सोनसाखळी हिसकावून पळ काढला होता.

आरोपी गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून अहिल्यानगर रस्त्यावरील बकोरी परिसरात सुरक्षारक्षक म्हणून काम करत होते. गोळीबार करून आरोपी दुचाकीवरुन पसार झाले होते. एका आरोपीच्या दुचाकीवर दंड लागू होता. सीसीटीव्ही चित्रीकरणात पोलिसांनी दुचाकीचे क्रमांक तपासले. तेव्हा एका दुचाकीवर दंडात्मक कारवाई करण्यात आली होती. दंडात्मक कारवाईचे ई-चलन तपासण्यात आल्यानंतर आरोपीचे नाव निष्पन्न झाली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com