

बुलंदशहरमध्ये अल्पवयीन मुलीची बलात्कार करून हत्या
आरोपीचं पोलिसांकडून एन्काऊंटर
आरोपीने पोलिसांवर गोळीबार केला होता
गोळीबारात दोन पोलिस अधिकारी जखमी
उत्तर प्रदेशमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करणाऱ्या आरोपीचा पोलिसांनी एन्काऊंटर केला. उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरामध्ये रविवारी पहाटे ही घटना घडली. आरोपीला अटक करण्यासाठी पोलिस गेले असता आरोपीने त्यांच्यावर गोळीबार केला. यावेळी झालेल्या चकमकीत पोलिसांनी आरोपीचा एन्काऊंटर केला. तर या चकमकीत २ पोलिस अधिकारी जखमी झाले.
मोनू असं आरोपीचे नाव होते. १ ऑगस्ट रोजी आरोपी काकोड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका अल्पवयीन मुलीला फूस लावून सोबत घेऊन गेला होता. त्यानंतर त्याने पीडितेवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या केली होती. या घटनेनंतर आरोपी फरार झाला होता. पोलिस त्याचा शोध घेत होते. त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी ५० हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.
आरोपी आणि त्याचा मित्र गुलाओठी पोलिस ठाणाच्या हद्दीतील छप्रवत गावाजवळ असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर स्वॅट टीम आणि स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी संपूर्ण परिसराला घेराव घातला आणि आरोपीचा शोध सुरू केला. त्याचवेळी दुचाकीवर असलेल्या आरोपींनी पोलिसांना पाहून गोळीबार केला. पोलिसांनी प्रत्युत्तर दिलं. या गोळीबारात मोनूला गोळी लागली. पोलिस पथकाने त्याला तातकडीने रुग्णालयात नेले पण डॉक्टरांनी उपचारापूर्वी त्याला मृत घोषित केले.
चकमकीदरम्यान आरोपी मोनूचा साथीदार घटनास्थळावरून पळून गेला. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. आरोपींना पकडताना झालेल्या चकमकीमध्ये पोलिस उपनिरीक्षकासह दोन पोलिस अधिकारी जखमी झाले. गुलाओठी आणि सिकंदराबाद पोलिस ठाण्याच्या प्रभारींच्या बुलेटप्रूफ जॅकेटलाही गोळ्या लागल्या. पोलिसांनी घटनास्थळावरून एक पिस्तूल, दोन मॅगझिन, काडतुसे आणि नंबर प्लेट नसलेली एक दुचाकी जप्त केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.