लाचखोरीत पोलिस विभाग सर्वात पुढे! एसीबीच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर, २ कोटींहून अधिकचा व्यवहार उघड...

Maharashtra ACB Report: लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) अहवालानुसार जानेवारी ते जुलै २०२६ या कालावधीत महाराष्ट्रात ४३९ लाचखोरीचे गुन्हे नोंदवले गेले. २.२० कोटी रुपयांच्या कथित लाचेचे व्यवहार उघडकीस आले असून ६३२ आरोपींवर कारवाई करण्यात आली.
Police department tops bribery cases in Maharashtra
Police department tops bribery cases in MaharashtraSaam TV (AI image)
Published On

संजय गडदे, मुंबई प्रतिनिधी, साम टीव्ही मराठी

Maharashtra ACB bribery report 2026 : राज्यातील सरकारी यंत्रणांमधील भ्रष्टाचाराचे चिंताजनक चित्र समोर आले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) (ribery Cases Maharashtra) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, जानेवारी ते जुलै २०२६ या सात महिन्यांत राज्यभरात ४३९ लाचखोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्यामध्ये २.२० कोटी रुपयांच्या लाचेच्या व्यवहारांचा पर्दाफाश झाला आहे. (Maharashtra ACB Report)

एसीबीच्या अहवालानुसार, लाच मागितलेल्या रकमेत पोलिस विभाग सर्वाधिक पुढे आहे. पोलिस विभागाशी संबंधित प्रकरणांमध्ये ५४.६५ लाख रुपयांची लाच मागितल्याची नोंद झाली आहे. त्यानंतर महसूल व भूमी अभिलेख विभाग (३३.४३ लाख), विक्रीकर विभाग (२१.३६ लाख), सार्वजनिक बांधकाम विभाग (१९.२२ लाख) आणि पंचायत समिती (११ लाख) यांचा क्रमांक लागतो. (Police department tops bribery cases in Maharashtra)

Police department tops bribery cases in Maharashtra
Mumbai Pune Expressway Accident: मिसिंग लिंकच्या बोगद्यात मध्यरात्री भीषण अपघात, पुण्यातील युवा नेत्याचा जागीच मृत्यू

या कालावधीत दाखल झालेल्या ४३९ प्रकरणांमध्ये ६३२ आरोपींना नामजद करण्यात आले असून, त्यात १०९ दलालांचा समावेश आहे. हे दलाल सरकारी अधिकाऱ्यांच्या वतीने लाचेचे व्यवहार घडवून आणत असल्याचे तपासात समोर आले आहे.

Police department tops bribery cases in Maharashtra
Pune : पुण्यात लव्ह ट्रँगलचा थरार! संतप्त प्रियकराने थेट हिंजवडी गाठून एक्सच्या नव्या पार्टनरला संपवलं, तरुणीही गंभीर

गेल्या वर्षी याच कालावधीत ४१९ गुन्हे दाखल झाले होते. यंदा हा आकडा ४३९ वर पोहोचल्याने राज्यातील भ्रष्टाचाराचे प्रमाण अद्यापही चिंताजनक असल्याचे एसीबीच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com