Pune : पुण्यात लव्ह ट्रँगलचा थरार! संतप्त प्रियकराने थेट हिंजवडी गाठून एक्सच्या नव्या पार्टनरला संपवलं, तरुणीही गंभीर

Pune Hinjawadi Crime News: पुण्यातील हिंजवडी परिसरात कथित प्रेमसंबंधाच्या वादातून एका तरुणाची हत्या झाल्याची आणि एका तरुणीवर गंभीर हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी पुणे-सोलापूर महामार्गावर आरोपीला अटक केली.
Pune Hinjawadi murder case latest updates
Pune Hinjawadi murder case latest updatesसाम टीव्ही मराठी (AI image)
Published On

गोपाल मोटघरे, साम टीव्ही मराठी

Pune Hinjawadi murder case latest updates : आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडी परिसरात एक अत्यंत धक्कादायक आणि भयंकर घटना घडली आहे. संशयास्पद प्रेमसंबंधाच्या वादातून एका तरुणावर लोखंडी रॉडने हल्ला करून त्याची निर्घृण हत्या करण्यात आली, तर एक तरुणी या हल्ल्यात गंभीर जखमी झाली आहे. गुरुवारी (६ ऑगस्ट) ही धक्कादायक घटना घडली.

घटनेनंतर पंढरपूरच्या दिशेने पळून जाणाऱ्या संशयित आरोपीला उरुळी कांचन पोलिसांनी पुणे-सोलापूर महामार्गावर सिनेमॅटिक पद्धतीने नाकाबंदी करून वाहनासह ताब्यात घेतले आहे. दिनेश महादेव झांबरे (वय २३, रा. पळशी, ता. पंढरपूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

Pune Hinjawadi murder case latest updates
मोठी बातमी! भाजपच्या बड्या नेत्याला मध्यरात्री अटक, महाराष्ट्रात राजकीय खळबळ

नेमकी काय घडली घटना?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दिनेश आणि संबंधित तरुणीचे शालेय जीवनापासून प्रेमसंबंध होते. पुढील शिक्षणासाठी दोघेही पुण्यात आले होते. दरम्यान, या तरुणीचे तिच्या शिक्षण संस्थेतील दुसऱ्या एका तरुणासोबत प्रेमसंबंध सुरू असल्याचा संशय दिनेशला आला. याच संशयातून तो प्रचंड संतप्त झाला होता.

Pune Hinjawadi murder case latest updates
Sunetra Pawar : सुनील तटकरेंचं प्रदेशाध्यक्षपद जाणार? बड्या नेत्याचा सुनेत्रा पवारांना सल्ला, राष्ट्रवादीत खळबळ

गुरुवारी दिनेशने थेट तो तरुण आणि तरुणी राहत असलेले ठिकाण गाठले. तिथे झालेल्या वादानंतर दिनेशने दोघांच्याही डोक्यात लोखंडी रॉडने भीषण वार केले. या हल्ल्यात त्या तरुणाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला, तर तरुणी गंभीर जखमी झाली आहे.

Pune Hinjawadi murder case latest updates
Mumbai Pune Expressway Accident: मिसिंग लिंकच्या बोगद्यात मध्यरात्री भीषण अपघात, पुण्यातील युवा नेत्याचा जागीच मृत्यू

घटनेनंतर आरोपी दिनेश आपल्या वाहनाने पंढरपूरच्या दिशेने पळ काढत होता. मात्र, घटनेची माहिती मिळताच उरुळी कांचन पोलिसांनी पुणे-सोलापूर महामार्गावर तातडीने नाकाबंदी लावली आणि संशयित आरोपीला गाठून त्याच्या मुसक्या आवळल्या. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com