मोठी बातमी! भाजपच्या बड्या नेत्याला मध्यरात्री अटक, महाराष्ट्रात राजकीय खळबळ

Vijay Chaudhary arrested : नंदुरबारमधील कथित व्हायरल ऑडिओ क्लिप प्रकरणात भाजपचे माजी प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. ॲट्रॉसिटी कायद्यासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली.
Former BJP leader Vijay Chaudhary being taken into police custody in Nandurbar during the investigation into the alleged viral audio clip case.
Former BJP Maharashtra leader Vijay Chaudhary after his arrest by the Nandurbar Local Crime Branch in connection with the alleged viral audio clip case.साम टीव्ही (AI Image)
Published On

सागर निकवाडे, नंदुरबार प्रतिनिधी

Vijay Chaudhary Arrest, Nandurbar News : काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या नंदुरबारमधील कथित व्हायरल ऑडिओ क्लिप प्रकरणात एक मोठी बातमी समोर आली आहे. भाजपचे माजी प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांना नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने अटक केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने विजय चौधरी यांना अटक केल्यानंतर वैद्यकीय तपासणी (Medical Test) करण्यात आली असून, त्यानंतर त्यांची रवानगी पोलीस ठाण्यात करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भाजपच्या मोठ्या नेत्यांशी संबंधित काही कथित ऑडिओ क्लिप्स सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या. याप्रकरणी माजी खासदार डॉ. हिना गावित यांच्या भावाने तक्रार दाखल केल्यानंतर विजय चौधरी यांच्यावर ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता. या गंभीर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या कारवाईमुळे उत्तर महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

Former BJP leader Vijay Chaudhary being taken into police custody in Nandurbar during the investigation into the alleged viral audio clip case.
एका निर्णयामुळे वाचू शकतात हजारो रुग्णांचे प्राण! विनोद तावडेंनी मांडला 'हा' अत्यंत महत्त्वाचा मुद्दा...

नेमकं प्रकरण काय आहे?

नंदुरबारमधील भाजपचे माजी प्रदेश महामंत्री तथा उत्तर महाराष्ट्र समन्वयक विजय चौधरी यांच्या काही कथित ऑडिओ क्लिप्स सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्या होत्या. या ऑडिओ क्लिप्समध्ये भाजपच्या माजी खासदार डॉ. हिना गावित आणि त्यांच्या कुटुंबाबाबत अतिशय अर्वाच्य, आक्षेपार्ह आणि जातिवाचक (कथित) भाषेचा वापर करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. याविरोधात हिना गावित यांचे चुलत भाऊ रोहन गावित यांनी तक्रार नोंदवल्यानंतर, नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात विजय चौधरी यांच्याविरोधात ॲट्रॉसिटीसह विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Former BJP leader Vijay Chaudhary being taken into police custody in Nandurbar during the investigation into the alleged viral audio clip case.
Bhandara Bandh : मोठी बातमी! आज 'भंडारा बंद'ची हाक; नेमकं कारण काय? पाहा काय उघडं अन् काय बंद राहणार

विजय चौधरी काय म्हणाले होते ?

विजय चौधरी यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले होते. या सर्व ऑडिओ क्लिप्स 'एआय' (AI) तंत्रज्ञानाचा वापर करून बनावट पद्धतीने तयार करण्यात आल्या असून मला आणि पक्षाला बदनाम करण्यासाठी विरोधकांनी रचलेले हे राजकीय षड्यंत्र आहे, असा दावा त्यांनी केला होता. या प्रकरणामुळे उत्तर महाराष्ट्रातील भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला असून राजकीय वातावरणात प्रचंड खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com