बागेत नेऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार, अश्लील फोटो काढत घरी नेत पुन्हा तेच; नगरमध्ये स्कूलबस चालकाकडून राक्षसी कृत्य

Ahilyanagar Crime News : पोलिसांनी आरोपींना अटक केली असून त्यांच्याविरोधात ॲट्रॉसिटी आणि पोक्सोअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बसचालक दादा उर्फ विकी भोसले आणि त्याला मदत करणारा योगेश माळी, अशी आरोपींची नाव आहेत.
Shrigonda taluka minor girl was abused
Shrigonda taluka minor girl was abusedSaam Tv News
Published On

अहिल्यानगर : अहिल्यानगरच्या श्रीगोंदा पोलीस स्टेशन हद्दीतील एका शाळेच्या खासगी बस चालकाने एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचं प्रकरण उघडकीस आलीये. राज्यात महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलेला असतानाच आता श्रीगोंद्यात घडलेल्या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर स्कूल बस चालकाने अत्याचार केला आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे अल्पवयीन मुलगी इयत्ता नववीच्या वर्गात शिकत आहे.

या याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. पोलिसांनी आरोपींना अटक केली असून त्यांच्याविरोधात ॲट्रॉसिटी आणि पोक्सोअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बसचालक दादा उर्फ विकी भोसले आणि त्याला मदत करणारा योगेश माळी, अशी आरोपींची नाव असून ते श्रीगोंदा तालुक्यातील घोडेगाव येथील राहणारे आहेत.

Shrigonda taluka minor girl was abused
Pune BJP- Congress Clash : पुण्यात भाजप-काँग्रेस आमनेसामने, नॅशनल हेरॉल्ड प्रकरणावरून राडा

आरोपींकडून अल्पवयीन मुलीला शाळेतून सोडताना रस्त्याच्या कडेला असलेल्या लिंबोणीच्या बागेत नेऊन तिच्यावर अत्याचार करत फोटो काढले आणि तेच फोटो आई-वडील यांना दाखवून जिवे मारण्याची धमकी देत पुन्हा आरोपीच्या राहत्या घरी नेऊन बलात्कार केला. मुलगी घाबरलेल्या अवस्थेत पाहिल्यानंतर त्या पिडीत मुलीला पालकांनी विचारले असता तिने घडलेला सर्व प्रकार पालकांना सांगितला आणि नंतर पालकांनी पोलीस ठाण्यात धाव घेत गुन्हा दाखल केलाय.

Shrigonda taluka minor girl was abused
Ajit Pawar: मुंबईजवळ आता तिसरं आंतरराष्ट्रीय विमानतळ, नेमकं कुठे होणार? अजित पवारांनी थेट सांगून टाकलं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com