Pune BJP- Congress Clash : पुण्यात भाजप-काँग्रेस आमनेसामने, नॅशनल हेरॉल्ड प्रकरणावरून राडा

BJP and Congress Clash in Pune Over National Herald Case : नॅशनल हेराल्ड प्रकरणावरून पुण्यात भाजप आणि काँग्रेस कार्यकर्ते भिडले. दोन्ही बाजूने जोरदार घोषणाबाजी झाली.

नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीनं सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. ही कारवाई सूडभावनेतून करण्यात आली असल्याचा आरोप काँग्रेस नेत्यांनी केला आहे. आता या प्रकरणावरून पुण्यात काँग्रेस पक्ष आक्रमक झाला होता. पुण्यातील खडकी रेल्वे स्थानकात काँग्रेस कार्यकर्त्यांनी लोकल अडवली. त्यानंतर भाजपनंही काँग्रेसविरोधात आक्रमक पवित्रा घेतला.

काँग्रेसच्या विरोधात भाजपकडून काँग्रेस भवनासमोर आंदोलन करण्यात येणार होते. त्यांना उत्तर देण्यासाठी काँग्रेस कार्यकर्तेही एकवटले होते. काँग्रेस भवनमध्ये कार्यकर्ते एकत्र येण्यास सुरुवात झाली. त्यामुळे परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला होता. तर दुसरीकडे बालगंधर्व चौकात भाजपचे युवा कार्यकर्ते एकत्र आले होते. आंदोलन करणाऱ्या भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना काँग्रेस भवनापासून १०० मीटरवर रोखण्यात आलं. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

दुसरीकडे भाजपच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसचे बॅनर फाडले. भाजप आणि काँग्रेसने परस्परांविरोधात आंदोलन केल्यामुळे वातावरण चिघळलं होतं. त्यात सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचे फोटो असलेला पोस्टर भाजपच्या कार्यकर्त्यांनी फाडला. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांच्या कार्यालयाच्या जवळ आंदोलन केलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com