

डिजिटल युगात आता वाचनापेक्षा पाहणं आणि व्हिडिओ स्वरूपातील माहितीला जास्त पसंती दिली जात असताना ‘सकाळ’ने आपला वाचकवर्ग टिकवून ठेवण्यात यश मिळवलंय. ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर ‘सकाळ’च्या वाचकांची संख्या सातत्याने वाढत असून, ही एक आनंदाची गोष्ट आहे. विशेष म्हणजे सलग सहा महिने ‘सकाळ’ने पहिला क्रमांक कायम राखला आहे. कॉमस्कोर मल्टी-प्लॅटफॉर्मच्या ताज्या आकडेवारीनुसार ई-सकाळ (esakal.com) हे सर्वाधिक वाचक असलेले आणि पहिल्या क्रमांकावर असलेले न्यूज पोर्टल ठरलंय.
ई-सकाळच्या डिजिटल नेटवर्कमध्ये गोमंतक, साम, अॅग्रोवन आणि सकाळ यांसारख्या अनेक ऑनलाइन वेब पोर्टल्सचा समावेश होतो. वेळोवेळी ताज्या घडामोडी आणि अपडेट्स देण्यात ई-सकाळ नेहमीच पुढे राहिलंय. कॉमस्कोर मल्टी-प्लॅटफॉर्मच्या आकडेवारीनुसार, सकाळला तब्बल ६.२ कोटी युजर्स मिळाले आहेत. डिजिटल प्लॅटफॉर्मसाठी तयार केलेल्या मल्टिमीडिया कंटेंटमुळे वाचकांचा प्रतिसाद मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
वाचकांना या प्लॅटफॉर्मवर सर्व क्षेत्रांतील ताज्या घडामोडींची माहिती मिळते. यामध्ये सरकारी नियम, वाहतूक व्यवस्था, हवामानाचा अंदाज, वाहतूक कोंडीची माहिती, राजकारणातील घडामोडी, लाइफस्टाइल, मनोरंजन, बिझनेस तसेच विविध नवीन योजना अशा सर्व प्रकारच्या बातम्यांचा समावेश असतो. ई-सकाळ वेळोवेळी या सर्व बातम्या वाचकांपर्यंत पोहोचवत असते.
ताज्या आकडेवारीनुसार, ई-सकाळने इतर प्रमुख मराठी वृत्तसंस्थांना मागे टाकत पहिल्या क्रमांकावर आपले स्थान मजबूत केलंय. डिजिटल क्षेत्रात सातत्याने केलेली गुंतवणूक, वेगवान आणि विश्वासार्ह बातम्यांचं प्रसारण, विविध विषयांवरील दर्जेदार कंटेंट आणि झटपट ब्रेकिंग न्यूज देण्याचं धोरण यामुळे ई-सकाळला ही आघाडी मिळाल्याचं मानलं जातं.
सोशल मीडियाचाही या यशामध्ये मोठा वाटा आहे. सोशल मीडियावर सतत एक्टिव्ह राहून, ताज्या घडामोडींचं अपडेट्स देत आणि विश्वासार्ह पत्रकारिता जपत ई-सकाळने पहिला क्रमांक मिळवला आहे. तसंच डिजिटल माध्यमांचा वाढता वापर लक्षात घेता प्रादेशिक भाषांमधील पत्रकारितेला नवं आणि मोठं व्यासपीठ मिळालंय. मराठी ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मची वाढती लोकप्रियता हे याचेच एक स्पष्ट उदाहरण आहे. वाचकांसाठी हा प्लॅटफॉर्म ताज्या आणि विश्वासार्ह माहितीचा खरा खजिना आहे, असं म्हणता येईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.