विधान परिषद निवडणुकीदरम्यान फडणवीस सरकारचे मोठे निर्णय
महाराष्ट्र मंत्रिमंडळ बैठक ४ मोठा निर्णय घेण्यात आले
मंत्रालयामध्ये शासकीय विभाग पुनर्रचना
एमआयडीसी कर्ज उभारणी अधिकार
विधान परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीदरम्यान आज फडणवीस सरकारने ४ मोठे निर्णय घेतले. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाच बैठक पार पडली. या बैठकीत महत्वाचे निर्णय घेण्यात आले. सामान्य प्रशासन विभाग, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, वित्त विभाग आणि उद्योग विभागांतर्गत हे निर्णय घेण्यात आले आहेत. यामधील महत्वाचा निर्णय म्हणजे, मंत्रालयातील विभागांच्या पुनर्रचनेस सरकारने मान्यता दिली.
मंत्रालयीन विभागांच्या पुनर्रचनेस मान्यता देण्यात आली. १३ विभागांची पूनर्रचना यामुळे एकाच विभागात असलेल्या दोन उपविभागांचे स्वतंत्र विभाग होणार. आता ३३ प्रशासकीय विभाग होते त्यांची संख्या १० ने वाढून ४३ होणार आहे. नवीन पद निर्मिती होणार नाही पण विभागांना आता सुलभपणे काम करता येईल, अशा पद्धतीने कामकाजांची विभागणी होणार आहे. ही निर्णय प्रक्रिया गतीमान होणार आहे. (सामान्य प्रशासन विभाग)
राज्यातील नवीन महाविद्यालयांना अंतिम मान्यता, विस्तारीकरणात नवीन विद्याशाखा, अभ्यासक्रम व नवीन विषय, तुकडी यांना मान्यता देण्यासाठी महाराष्ट्र सार्वजनिक अधिनियम २०१६ मध्ये सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आली. (उच्च व तंत्र शिक्षण विभाग)
केंद्रीय वस्तू व सेवा कर अधिनियम २०१७ मधील तरतुदींना सुसंगत आणि सूसत्रतेसाठी महाराष्ट्र वस्तू व सेवा कर अधिनियम २०१७ मध्ये सुधारणा तसेच त्याअन्वये महाराष्ट्र वस्तू व सेवा कर (सुधारणा) विधेयक २०२६ मध्ये सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आली. (वित्त विभाग)
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडसाठी कर्ज उभारणीकरता अधिकारात वाढ करणार. अध्यादेश काढण्यास तसेच महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१ मध्ये सुधारणा करण्यास मंजुरी देण्यात आली. (उद्योग विभाग)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.