Gold Today Update : सुवर्णबाजारात सोन्या - चांदीच्या दरात उसळी, चांदी ४ हजारांनी महागली; जाणून घ्या सोन्याचे ताजे दर

Maharashtra Gold Rate Today Update : मध्यपूर्वेतील वाढत्या तणावाचा परिणाम जळगावच्या सराफा बाजारावर दिसून आला आहे. सोन्याच्या दरात प्रतिदहा ग्रॅम १,५०० रुपयांची तर चांदीच्या दरात प्रतिकिलो ४,००० रुपयांची वाढ झाली आहे.
JALGAON GOLD AND SILVER PRICES SURGE AMID MIDDLE EAST TENSIONS, GOLD HITS ₹1.51 LAKH
JALGAON GOLD AND SILVER PRICES SURGE AMID MIDDLE EAST TENSIONS, GOLD HITS ₹1.51 LAKHSaam Tv
Published On
Summary
  • जळगावच्या सराफा बाजारात सोन्याच्या १,५०० रुपयांची वाढ

  • चांदीच्या दरात प्रतिकिलो ४,००० रुपयांची उसळी

  • सोन्याचा दर १,५१,००० रुपये तर चांदीचा दर २,४९,००० रुपये

  • दरवाढीमुळे ग्राहकांवर आर्थिक ताण वाढला

Maharashtra Jalgaon Gold Market Update मध्यपूर्वेतील वाढत्या ताणतणावाची झळ भारताला देखील लागली आहे. यामुळे इंधन दरवाढीसोबतच आता सोने चांदीवर देखील त्याचा परिणाम पाहायला मिळत आहे. सुवर्णनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगावातील सराफा बाजार उघडताच सोने चांदीच्या दरात मोठा बदल पाहायला मिळाला. काही दिवसांपासून घसरलेल्या सोन्या चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सोने दहा ग्रॅममागे १,५०० रुपयांनी वाढले असून चांदीच्या दरात प्रतिकिलो ४,००० रुपयांची उसळी पाहायला मिळाली आहे. दरम्यान सण उत्सवाच्या काळात सोने चांदीचे दर वाढल्याने खरेदीदारांवर संकट कोसळलं आहे.

आजचे सोने चांदीचे ताजे दर

सराफा व्यावसायिकांच्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी घसरलेले दर आज पुन्हा वाढले आहेत.जळगावच्या सराफा बाजारात आज सोन्याची किंमत प्रति दहा ग्रॅम १, ५१,००० रूपयांवर पोहचले आहे. तर दुसरीकडे चांदीच्या दरामध्ये ४ हजारांनी वाढ झाली असून आजचे ताजे दर प्रतिकिलो २, ४९,००० रूपयांवर पोहचले आहे. वाढत्या महागाईमुळे नागरिकांच्या खिशाला कात्री लागली आहे.

JALGAON GOLD AND SILVER PRICES SURGE AMID MIDDLE EAST TENSIONS, GOLD HITS ₹1.51 LAKH
AC Control Tips : AC चा स्विंग मोड कधी चालू करावा? काय आहेत फायदे? जाणून घ्या

सोने चांदीचे दर सतत का बदलतात?

आंतरराष्ट्रीय पातळीवरील आर्थिक अनिश्चितता आणि सुरक्षित गुंतवणुकीसाठी वाढलेली मागणी यामुळे सोन्या-चांदीच्या दरांमध्ये अस्थिरता कायम राहू शकते. येत्या काळातही जागतिक बाजारातील घडामोडींवर अवलंबून दरांमध्ये चढ-उतार सुरू राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. परिणामी, दररोजच्या चढ-उतारामुळे ग्राहकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः लग्नसराईचा हंगाम पुन्हा सुरू होत असल्याने दागिने खरेदीचा विचार करणाऱ्या नागरिकांसाठी हा दरवाढीचा फटका मानला जात आहे.

JALGAON GOLD AND SILVER PRICES SURGE AMID MIDDLE EAST TENSIONS, GOLD HITS ₹1.51 LAKH
Monsoon Update : मान्सून संपूर्ण महाराष्ट्र कधी व्यापणार? IMD नं तारीख सांगितली, मुंबई-पुण्याच्या पावसावरही दिली अपडेट

सोमवारचे सोने चांदीचे दर

जळगावच्या सराफा बाजारात सोमवारी ८ जून रोजी सोन्याचे दर प्रतिदहा ग्रॅम (विनाजीएसटी) १, ४९, ५०० इतकी होती. तर चांदीचे दर प्रतिकिलो (विनाजीएसटी) २, ४५,००० इतकी होती. अमेरिका इराण मधील युद्धाचा हा परिणाम असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे असून पुढील काही दिवसांमध्ये हे दर कसे राहणार याकडे गुंतवणूकदार आणि खरेदीदारांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com