Monsoon Update : मान्सून संपूर्ण महाराष्ट्र कधी व्यापणार? IMD नं तारीख सांगितली, मुंबई-पुण्याच्या पावसावरही दिली अपडेट

Maharashtra Monsoon Rain Update : मुंबईत पुढील दोन दिवसांत मान्सून दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. अल निनो वादळाच्या संकटामुळे मान्सून उशिराने दाखल होणार. आज राज्यातील अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी.
MUMBAI MONSOON ARRIVAL LIKELY IN TWO DAYS; YELLOW ALERT ISSUED IN SEVERAL MAHARASHTRA DISTRICTS
MUMBAI MONSOON ARRIVAL LIKELY IN TWO DAYS; YELLOW ALERT ISSUED IN SEVERAL MAHARASHTRA DISTRICTSSaam Tv
Published On
Summary
  • महाराष्ट्रात मॉन्सूनची प्रतीक्षा कायम

  • मुंबईत पुढील दोन दिवसांमध्ये मान्सूनचं आगमन

  • शेतकऱ्यांना पेरणी न करण्याचे आवाहन

  • मॉन्सून तळकोकणासह कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यात पोचला

Maharashtra Mumbai Pune Monsoon Rain Update जूनच्या पहिल्याच आठवड्यात मान्सून गोवानंतर तिथून पुढे महाराष्ट्रातील तळकोकणात सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरमध्ये धडकला. मात्र अद्यापही राज्याच्या कानाकोपऱ्यात नैऋत्य मौसमी वारे पोचले नसल्याने उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. मान्सूनच्या आगमनाकडे नागरिकांचे लक्ष लागले असून येत्या दोन दिवसांत मान्सून मुंबईत दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. अल निनो सारख्या महाभयंकर संकटामुळे मान्सूनची प्रगती मंदावली असल्याचं हवामान विभागाने स्पष्ट केलं.

राज्यातील अनेक जिल्ह्यांना आज यलो अलर्ट जारी करण्यात आला असून काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध भागांत विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी कोसळत आहेत. मात्र हा पाऊस मान्सूनचा नसून पूर्वमोसमी पाऊस असल्याचे हवामान तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.

MUMBAI MONSOON ARRIVAL LIKELY IN TWO DAYS; YELLOW ALERT ISSUED IN SEVERAL MAHARASHTRA DISTRICTS
AC Control Tips : AC चा स्विंग मोड कधी चालू करावा? काय आहेत फायदे? जाणून घ्या

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, उर्वरित महाराष्ट्रात मान्सून पूर्णपणे सक्रिय होण्यासाठी आणखी तीन ते चार दिवस प्रतीक्षा करावी लागू शकते. मुंबईत २ दिवसांमध्ये मान्सूनचं आगमन होणार असल्याचा अंदाज आहे. (Mumbai Monsoon Rain Alert) मान्सूनचा प्रवास यंदा काहीसा संथ गतीने होत असला तरी तो टप्प्याटप्प्याने पुढे सरकत आहे. प्रत्येक वर्षी मान्सूनच्या प्रवासाचा वेग कमी-अधिक प्रमाणात बदलत असतो. समुद्रातील वातावरणातील बदल, मान्सून वाऱ्यांची तीव्रता तसेच उत्तरेकडील वाऱ्यांचा प्रभाव यामुळे मान्सूनच्या वाटचालीवर परिणाम होत असतो.

सध्या राज्यातील काही भागांत होत असलेला वादळी पाऊस आणि विजांचा कडकडाट हा पूर्वमोसमी वातावरणाचा परिणाम असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाईघाईने पेरणी करण्याचे टाळावे, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे. कृषी तज्ज्ञांच्या मते, खरीप हंगामातील पेरणीसाठी पुरेसा आणि सतत पडणारा पाऊस आवश्यक आहे. आगामी काही दिवसांत मान्सूनची प्रगती अधिक वेगाने होण्याची शक्यता असून राज्यातील बहुतांश भागांत पावसाची तीव्रता वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com