

आता वारंवार KYC करण्याची गरज नाही
एकदाच CKYC नंबर जनरेट करा
केवायसी करताना कोणतेही कागदपत्र अपलोडची गरज नाही
आता अनेक गोष्टी डिजिटल झाल्या आहेत. अवघ्या काही मिनिटांत तुम्ही महत्त्वाची कामे करु शकतात. दरम्यान, आता अनेक पैशांसंबंधित कामांसाठी ईकेवायसी करणे अनिवार्य केले आहे. ईकेवायसी करणे म्हणजे त्या व्यक्तीचे व्हेरिफिकेशन करणे. आता बँक खातेधारकांनाही एका ठरावीक काळानंतर केवायसी करावी लागते.सरकारी योजनांसाठीही ईकेवायसी अनिवार्य आहे. प्रत्येक वेळी परत केवायसी करावी लागत असल्याने अनेकदा खूप कंटाळा होतो. यावरच आता एक उपाय काढण्यात आला आहे. आता तुम्हाला फक्त एकदाच CKYC नंबर जनरेट करायचा आहे. यामुळे तुमची ओळख पूर्णपणे डिजिटल होणार आहे.
CKYC नंबरमुळे तुम्हाला वारंवार केवायसी करावी लागणार नाही. वारंवार तुम्हाला आधार पॅन कार्ड अपलोड करावे लागणार नाही. याचसोबत सतत बायोमेट्रिकदेखील करावे लागणार नाही. CKYC मुळे तुमची ईकेवायसी डायरेक्ट होणार आहे.
CKYC आहे तरी काय? (What is CKYC)
CKYC हा एक १४ अंकी नंबर आहे. या नंबरचा व्हेरिफिकेशनसाठी वापर केला जातो. यामुळे ऑफलाइन पद्धतीने कागदपत्रांचा वापर करावा लागणार नाही. तुम्ही फोनवरुन CKYC नंबर जनरेट करु शकता.
CKYC म्हणजे Central Know Your Customer. हा नंबर तुमची एक ओळख असणार आहे. याद्वारे तुमचे सर्व कागदपत्र जसे की फोटो, आधार आणि पॅन कार्ड डिजिटल स्वरुपात सेव्ह केले जातात. यामुळे केवायसी करताना तुम्हाला सतत कागदपत्र अपलोड करावे लागणार नाही.
CKYC कसं जनरेट करायचं? (How to Generate CKYC Card)
सर्वात आधी तुम्हाला लॅपटॉपवर CKYC टाइप करायचे आहे. यामधील अधिकृत लिंक ओपन करा.
यानंतर New User To CKYC वर क्लिक करा.
यानंतर मोबाईल नंबर आणि कॅप्चा कोड टाकायचा आहे.
यानंतर तुम्हाला काही प्रोसेस फॉलो करायच्या आहेत. तुम्हाला एसएमएसवर लिंक मिळणार आहे.
या लिंकवर जाऊन तुम्ही CKYC कार्ड डानलोड करु शकतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.