Ladki Bahin Update: बंद झालेला ₹१५०० चा हप्ता पुन्हा सुरू होणार? e-KYC वर मंत्र्याची मोठी घोषणा, जाणून घ्या नवी अपडेट

e-KYC deadline extension Maharashtra : ई-केवायसी न केल्यामुळे लाडकी बहीण योजनेचा १५०० रुपयांचा लाभ बंद झालेल्या लाखो महिलांसाठी दिलासादायक बातमी आहे. राज्य सरकारकडून ई-केवायसीसाठी मुदतवाढ देण्याचा विचार सुरू आहे.

Ladki Bahin Yojana e-KYC deadline extension latest update : ई केवाय न केलेल्या राज्यातील लाखो लाडक्या बहि‍णींना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. राज्य सरकारकडून ई केवायसीची मुदत वाढवण्यात येणार असल्याचं समोर आले आहे. महायुतीमधील कॅबिनेट मंत्री नरहरी झिरवाळ यांनी राज्यातील लाडक्या बहि‍णींना ई केवायसीसाठी मुदतवाढ होणार असल्याचे वक्तव्य केलेय. २६ जानेवारी रोजी, प्रजासत्ताक दिनाला हिंगोलीमध्ये बोलताना मंत्री झिरवाळ यांनी ई केवायसीच्या मुदतवाढीवर वक्तव्य केलेय. अपात्र महिलांना वगळण्यसाठी राज्य सरकारकडून ३१ डिसेंबरपर्यंत ईकेवायसीची मुदत दिली होती. पण मुदत संपल्यानंतरही अनेक महिलांना ई केवायसी करता आली नाही, अथवा त्यामध्ये चूका झाल्या. त्यामुळे अनेक महिलांचा प्रति महिना १५०० रूपयांचा लाभ बंद झाला. राज्यभरातून यामुळे लाडक्या बहि‍णींच्या संतप्त प्रतिक्रिया येत आहे. धुळे, हिंगोली अन् भंडाऱ्यासारख्या जिल्ह्यात लाडक्या बहि‍णींनी जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयावर मोर्चा काढला होता. आता सरकारकडून लाडक्या बहि‍णींना मुदतवाढ देण्याबाबत विचार करण्यात येत असल्याचे समजतेय. मंत्री नरहळी झिरवाळ यांनी मुदतवाढ मिळणार असल्याचे संकेत दिले आहेत. लवकरच यावर अधिकृत निर्णय होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com