Indian Railway News : घाबरु नका! प्रवास करताना रेल्वेचे तिकीट फाटले किंवा हरवले? लगेच करा हे काम, अन्यथा भरावा लागेल दंड

What is Charges for Duplicate Railway Ticket : तिकीट हरवल्यावर भारतीय रेल्वेचे काय नियम आहेत?
Indian Railway News
Indian Railway NewsSaam Tv
Published On

Indian Railway Ticket Rules : अनेकांच्या धावपळीच्या जीवनाची सुरुवात ही रेल्वेने होते. खिशाला परवडणारी व सहज सोपी अशी वाहतुक म्हणजे रेल्वे. लाखो लोकांच्या कामाची सुरुवात ही ट्रेनने होते.

गावी जाताना किंवा लांबचा पल्ला गाठताना आपण भारतीय रेल्वेने प्रवास करतो. रेल्वे प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी तिकीट काढावे लागेल. जर तुम्ही तिकीट काढले नाही आणि पकडले गेले तर तुम्हाला दंड भरावा लागेल. रेल्वेने प्रवास करताना बरेचदा आपले तिकीट हरवते किंवा ते काही कारणांमुळे फाटते अशावेळी आपल्याला भीती वाटते की, टीटीने पकडले तर त्यांचा दंड भरावा लागेल. तिकीट हरवल्यावर भारतीय रेल्वेचे काय नियम आहेत? प्रवासी ट्रेनमध्ये प्रवास करू शकत नाहीत की त्यांना दंड भरावा लागेल? जाणून घेऊया भारतीय रेल्वेच्या नियमांबद्दल

Indian Railway News
Medical Facilities by Indian Railway: रेल्वे प्रवासादरम्यान तब्येत बिघडली तरी नो टेन्शन, ५० स्टेशन्सवर खास सुविधा उपलब्ध

1. भारतीय रेल्वे नियम

प्रवास (Travel) करताना रेल्वेचे (Railway) तिकीट हरवले तर घाबरण्याची गरज नाही. अशावेळी आपण डुप्लिकेट तिकीट बनवून प्रवास करु शकतात. यासाठी प्रत्येक वर्गासाठी डुप्लिकेट तिकीटांसाठी काही चार्जेस भरावे लागतात. त्यासाठी आपण TTE वर जाऊन आपण डुप्लिकेट तिकीट मिळवू शकतो. याशिवाय आपल्याला रेल्वे स्टेशनवरुनही डुप्लिकेट तिकिटेही मिळू शकतात.

2. डुप्लिकेट तिकीट चार्जेस

indianrail.gov.in च्या वेबसाइट्सनुसार प्रवास करताना तिकीट हरवल्यास आपल्याला त्याचे डुप्लिकेटसाठी चार्जेस भरावे लागतात. हे पैसे ट्रेनच्या डब्ब्यावर अवलंबून असतात. 2nd स्लीपर क्लाससाठी ५० रुपये शुल्क भरावे लागतात. तर त्यावरील श्रेणीसाठी १०० रुपये अधिक मोजावे लागतील. जर तुमचे कन्फर्म तिकीट हरवल्यास आपल्याला डुप्लिकेट तिकीटासाठी 50 टक्के भाडे द्यावे लागेल. जर तुमचे हरवलेले तिकीट मिळाल्यास ट्रेन सुटण्यापूर्वी रेल्वे स्टेशनच्या काउंटवर जाऊन डुप्लिकेट तिकीटासाठी भरलेले पैसे परत मिळवू शकतो.

Indian Railway News
Indian Railway Rules: गणपतीत कोकणात जायचा प्लान करताय? लोअर बर्थ सीट कशी मिळेल? जाणून घ्या रेल्वेचा नियम

3. तिकीट फाटले तर काय कराल?

बरेचदा आपल्या काही चुकांमुळे तिकीट (Ticket) फाटते अशावेळी आपल्याला डुप्लिकेट तिकीट काढावे लागते. यासाठी प्रवाशांना २५ टक्के भाडे भरावे लागतात. जर वेटिंग तिकीट फाटले तर तुम्हाला डुप्लिकेट तिकीट मिळू शकत नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com