Indian Railway Rules
Indian Railway RulesSaam tv

Indian Railway Rules: गणपतीत कोकणात जायचा प्लान करताय? लोअर बर्थ सीट कशी मिळेल? जाणून घ्या रेल्वेचा नियम

How To Book Lower Birth Train Ticket: लोअर बर्थ तिकीट कसे मिळवाल? सर्वात आधी प्राधान्य कोणाला?
Published on

How To Book Lower Birth Train Ticket :

खरेतर ट्रेनचा प्रवास जितका सुकर तितकाच त्रासदायक. प्रवास करताना तो अधिक सुकर व्हावा यासाठी रेल्वे प्रवाशांसाठी अधिक काळजी घेत असते. लाखो लोकांच्या कामाची सुरुवात ही ट्रेनने होते. अनेकांच्या खिशाला परवडणारी व सहज-सोपी अशी वाहतुक म्हणजे रेल्वे.

अनेकदा गावी जाताना किंवा रेल्वेने प्रवास करताना आपण भारतीय रेल्वेने प्रवास करतो. जेव्हा आपण रेल्वेने प्रवास करतो तेव्हा तिकीट बुक करताना आपण आपल्या सोयीनुसार ते बुक व्हावे अशी आपली इच्छा असते. अनेकांना तिकीट बुक करताना ते लोअर बर्थ सीटचे हवे असते.

Indian Railway Rules
Jio Independence Day Offer 2023 : 15 ऑगस्टनिमित्त जिओची बंपर ऑफर! एकदा रिचार्ज करा वर्षभर Validity मिळवा

अशातच भारतीय रेल्वेने (Railway) लोअर बर्थबाबत काही नियम केले आहे. जर तुम्हालाही प्रवास करताना तो लोअर बर्थ घ्यायचा असेल तर हे नियम जाणून घ्यायला हवे. बुकिंग (Booking) करताना काय काळजी घ्याल हे देखील जाणून घ्या.

1. कोणाला मिळतो लोअर बर्थ?

IRCTC ने रेल्वेने लोअर बर्थसाठी काही लोकांसाठी राखीव जागा ठेवल्याची माहीती दिली आहे. त्यांना ही जागा आधी दिली जाते. त्यानंतर दुसरा बर्थ दिला जातो. हा लोअर बर्थ आधी शारीरकदृष्ट्या विकलांग लोकांना दिला जाईल असे रेल्वेने सांगितले आहे. यानंतर ते ज्येष्ठ नागरिक व महिलांची (Women) अशी विभागणी केली जाते.

Indian Railway Rules
Indian Railway Medical Scheme: घाबरु नका, प्रवास करताना अचानक ट्रेनमध्ये तब्येत बिघडली? या ५० रेल्वे स्टेशनवर मिळतील स्वस्तात औषधे

रेल्वे बोर्डाच्या आदेशानुसार अपंगांसाठी स्लीपर क्लासमध्ये चार, एसीमध्ये दोन जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. गरीब रथ ट्रेनमध्येही अपंगांसाठी दोन जागा राखीव असतात. त्याच ज्येष्ठ नागरिकांना न विचारता ओव्हर बर्थ दिला जातो. दुसरीकडे, जर गर्भवती महिला असेल तर तिलाही लोअर बर्थ दिला जातो. तुम्ही IRCTC वेबसाइटवर जाऊन याचे तिकीट बुक करू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com