

Apple चे सीईओ टिम कुक राजीनामा देणार
अॅपलचे नवीन सीईओ कोण?
१ सप्टेंबरपासून हातात घेणार नेतृत्व
अॅपल कंपनीमध्ये महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. आता अॅपलचे सीईओ टीम कुक यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. ते अॅपल कंपनीची सीईओ पदाची धुरा सोडणार आहेत. त्यांच्यानंतर जॉन टर्नस हे अॅपलचे नवीन सीईओ होणार आहे. टीम कुक हे कंपनीत एक्झिक्युटिव्ह चेअरमन पदावर काम करतील.
अॅपलचे नवीन सीईओ कोण? (Who is Apple New CEO John Ternus)
जॉन टर्नस हे सध्या अॅपल कंपनीत हॉर्डवेअर इंजिनियरिंग चीफ पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या २५ वर्षांपासून कंपनीत काम करत आहेत. यानंतर आता ते अॅपल कंपनीत सीईओ म्हणून कार्यरत होणार आहेत. १ सप्टेंबरपासून ते ही जबाबदारी घेणार आहेत. टीम कुक यांच्या राजीनाम्यानंतर जॉन टर्नस नवीन सीईओ असणार आहे.
अॅपल कंपनीतील हा बदल खूप महत्त्वाचा मानला जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून टिम कुक सीईओ पदाचा राजीनामा देतील, अशी चर्चा होती. त्यानंतर आता शेवटी टिम कुक सीईओ पदाचा राजीनामा देणार आहेत. टिम कुक हे २०११ पासून कंपनीचे नेतृत्व करत आहेत.स्टीव जॉब्स यांच्यानंतर टिम कुक यांनी सीईओ पदाचा कारभार स्विकारला होता.
टिम कुक यांचा प्रवास (Tim Cook Apple CEO Journey)
टिम कुक (Tim Cook) हे सध्या ६५ वर्षांचे आहेत. ते सप्टेंबर महिन्यात जॉन टर्नस यांच्यावर सीईओ पदाची जबाबदारी सोपवणार आहेत. टिम कुक यांनी १९९८ मध्ये अॅपल कंपनी जॉइन केली होती. त्यांनी ऑपरेशन टीममध्ये काम केले. २००५ ते २०११ पर्यंत त्यांनी चीफ ऑपरेटिंग ऑफिसर पदावर काम केले. या काळात त्यांनी आयपॅड, मॅकबुक, आयफोन, आयपॅड प्रोडक्ट्सच्या सप्लाय चैनला चांगले केले.
२०११ मध्ये बनले सीईएओ (Apple CEO)
स्टीव्ह जॉब यांनी आपल्या आपल्या आजारपणामुळे अॅपचे सीईओ पद सोडले. यानंतर त्यांनी टिम कुक यांच्याकडे सीईओ पदाची धुरा दिली. यानंतर कंपनीने खूप प्रगती केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.