ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
सीताफळा हे एक स्वादिष्ट फळ आहे. जे शरिराला त्वरित उर्जा प्रदान करण्यास मदत करते.
सीताफळामध्ये असलेले फायबर पचनसंस्था मजबूत करते आणि बद्धकोष्ठतेची समस्या कमी करते.
सीताफळात व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते जे रोगप्रतिकारक शक्ती सुधारण्यास मदत करते.
सीताफळाचे सेवन केल्याने अशक्तपणा दूर होतो आणि शरीराला आतून शक्ती मिळते.
सीताफळ हे डोळ्यांसाठी फायदेशीर मानले जाते.
यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स त्वचा निरोगी आणि चमकदार बनवण्यास मदत करतात.
मर्यादित प्रमाणात सीताफळ खाल्ल्याने मन शांत राहून ताण कमी होण्यास मदत होते.