ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
महिन्याच्या सुरुवातीलाच संपूर्ण जेवणाचा आराखडा तयार करणे म्हणजे महिन्याचा मेनू प्लॅन. यामुळे रोज “आज काय बनवायचं?” हा प्रश्न पडणार नाही.
बाजारात अनावश्यक खरेदी टाळता येते आणि जेवणात विविध प्रकार बनवता येतात.
महिन्याचे ४ आठवड्यामध्ये विभाजन करा. प्रत्येक आठवड्यासाठी 5 ते 6 भाज्या, 2 डाळी, 1 उसळ असा सोपा प्लॅन ठरवा.
सोमवारी - भाजी आणि आमटी, मंगळवारी- उसळ, बुधवारी- डाळ, गुरुवारी- भाजी आणि चपाती, शुक्रवारी - फ्रायडे स्पेशल यामुळे मेन्यू ठरवायचा ताण राहत नाही आणि पुन्हा पुन्हा तोच मेन्यू सुध्दा होत नाही.
आठवड्याभरासाठी नाश्ता व डबा आधी ठरवून घ्या. एका चार्टवर मेन्यू लिहून ठेवा. जसे की, पोहे, उपमा, थालीपीठ, पराठा, भाजी-चपाती.
मेनू पाहून भाज्या, डाळी, मसाले यांची लिस्ट तयार करा. आठवड्यातून 1 ते 2 वेळा बाजारात जावून सामान घेऊन या.
कांदा-टोमॅटो चिरून ठेवा, उसळ भिजवून ठेवा, ग्रेवी बेस तयार ठेवा. यामुळे स्वयंपाक अर्ध्या वेळेत होतो.