ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
बटाट्याचे हिरव्या चटणीचे काप कुरकुरीत बाहेरून आणि आतून मऊ, चविष्ट लागतात. बटाट्याचे काप हे लाल मसाल्याचे देखील असतात,पण हिरव्या चटणीचा स्वाद छान लागतो.
उकडलेले बटाटे, कोथिंबीर, हिरवी मिरची आले लसूण लिंबाचा रस मीठ – चवीनुसार बेसन तांदूळ पीठ हळद, जिरेपूड, तेल आणि रवा इ साहित्य लागते.
कोथिंबीर, हिरवी मिरची, आले, लसूण, मीठ आणि लिंबाचा रस घालून जाडसर चटणी वाटा.पातळ चटणी करू नका नाहितर चव लागणार नाही.
उकडलेले बटाटे गोल चकत्या म्हणजेच काप करून घ्या. काप फार पातळ नसाव्यात म्हणजे तुटणार नाहीत.
तयार केलेली हिरवी चटणी प्रत्येक बटाट्याच्या कापावर नीट लावा. चटणी जास्त घातली तर तळताना बाहेर येऊ शकते म्हणून चटणी योग्य प्रमाणात लावावी.
बेसन, तांदूळ पीठ, हळद, मीठ आणि थोडे पाणी घालून जाडसर पीठ तयार करा. तसेच थोडा रवा घ्या आणि त्यात थोडे हळद, मीठ टाका. हे कापांना कुरकुरीतपणा देते.
तेल गरम करून चटणी लावलेले काप पीठात बुडवून मध्यम आचेवर सोनेरी होईपर्यंत कुरकुरीत तळून घ्या.
गरमागरम काप टोमॅटो सॉस सोबत सर्व्ह करा. वरून चाट मसाला टाकला तर चव अधिक वाढते. तसेच काप अधिक कुरकुरीत हवे असतील तर पीठात चिमूटभर सोडा किंवा ओवा घाला आणि लगेच खा नाहितर ते लगेच मऊ होतात.