ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
घरातील व्यक्तींना दररोज वेगवेगळ्या प्रकारचा नाश्ता खायचा असतो. पण जर तुम्हाला नवीन पदार्थ शोधण्यात अडचण येत असेल, तर नाश्त्यासाठीचे हे ८ अनोखे पर्याय आताच पहा. यामुळे, तुम्हाला आठवड्याच्या प्रत्येक दिवशी काहीतरी वेगळे खायला मिळेल.
पोहे आणि रव्याच्या मिश्रणापासून छोटे गोल गोळे तयार करा. त्यानंतर त्यांना फोडणी देऊन तळा आणि चटणीसोबत सर्व्ह करा.
जर तुम्हाला प्रोटिनयुक्त नाश्ता बनवायचा असेल, तर मुगाची डाळ भिजवून वाटून घ्या आणि भाज्यांनी भरलेला स्वादिष्ट उत्तपम बनवा.
भाज्या आणि बेसन पीठ मिसळून बनवला जाणारा हांडवी प्रकार अवघड वाटत असेल, तर तो अप्पे पॅनमध्ये गोल आकारात बनवा.
तांदळाऐवजी ज्वारीचे पीठ डाळींसोबत मिसळून स्वादिष्ट इडल्या तयार करा.
पालक बारीक वाटून पिठात मिसळून पीठ मळून घ्या. आता त्यात पनीर आणि इतर भाज्यांचे सारण भरा.चविष्ट पालक रॅप तयार आहे.
बारीक केलेले सोया चंक्स गव्हाच्या पिठात मिसळून हाय प्रोटिनयुक्त पराठा तयार करा.
मखाना आणि चिया बिया दुधात भिजवून चिया पुडिंग तयार करा.
नाश्त्यासाठी पनीर आणि भाज्या मिसळून गव्हाचा दलिया बनवा. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत, सर्वांनाच तो आवडेल.