ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मेथी पासून अनेक प्रकार बनवले जातात. पराठे, भाजी आणि भजी इ. गोष्टी बनवल्या जातात. पण तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर मेथी वडी नक्कीच ट्राय करुन बघा. जाणून घ्या रेसिपी
मेथी, बेसन, हिरव्या मिरच्या , तांदळाचे पीठ, आले लसून पेस्ट, हळद, हिंग, जिरे, लाल तिखट, मीठ आणि तेल इ. साहित्य लागते.
मेथी स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्या. चिरून झाल्यानंतर थोडं मीठ लावून 5 मिनिटं ठेवून द्या, जेणेकरून मेथीचा कडूपणा कमी होईल. नंतर हलके दाबून त्यात असलेले अतिरिक्त पाणी काढून टाका.
बेसन, तांदूळ पीठ, मसाले, आले-लसूण पेस्ट आणि मेथी एकत्र मिक्स करुन घ्या. आता थोडं-थोडं पाणी घालून घट्ट पण मऊ पीठ मळून घ्या. तसेच पीठ मळताना थोडेसे तेल टाकावे याने वड्या मऊ आणि खमंग होतात.
पीठाचे छोटे-छोटे गोळे करून हाताने चपट्या वड्या बनवा. खूप पातळ वड्या करू नका, नाहीतर तुटण्याची शक्यता असते.
ताटाला तेल लावून त्यावर वड्या ठेवाव्यात. वड्या अंदाजे 10 ते 12 मिनिटे वाफवून घ्याव्या आणि गॅस बंद करावा. त्यानंतर वाफवलेल्या वड्या थंड झाल्यावर त्यांना आकार द्या.
आता या वड्या तेलात डीप फ्राय किंवा कमी तेलात शॅलो फ्राय करा. दोन्ही प्रकारे तळून मस्त वड्या कुरकुरीत होतात.
गरमागरम मेथी वडी टोमॅटो केचप किंवा हिरव्या चटणीसोबत सर्व्ह करा. दुपारच्या डब्यासाठी, प्रवासासाठी किंवा चहा टाइमसाठी मेथी वडी परफेक्ट डिश आहे.