ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
कोथिंबीर लिंबू डिटॉक्स ड्रिंक शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यासाठी आणि मेटाबॉलिझम वाढवण्यासाठी उत्तम मानलं जाते. सकाळी उठल्यावर हे डिटॉक्स ड्रिंक प्यायल्यास शरीर हलकं आणि ताजंतवानं वाटते.
कोथिंबीरमध्ये अँटिऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन A, C, K भरपूर प्रमाणात असतात. कोथिंबीर लिव्हर साफ करते आणि पचन सुधारते.
लिंबातील व्हिटॅमिन C इम्युनिटी मजबूत ठेवते, शरीरातील pH बॅलन्स करते आणि फॅट कट करण्यास मदत करते.
एक मूठ ताजी कोथिंबीर, अर्धा लिंबू, एक ग्लास कोमट पाणी, इच्छेनुसार मध
कोथिंबीर स्वच्छ धुऊन मिक्सरमध्ये घ्या. त्यात कोमट पाणी घालून एकसारखा रस तयार करा. मग हा रस गाळून कपात घ्या आणि त्यात लिंबाचा रस पिळा.
सकाळी रिकाम्या पोटी हे ड्रिंक प्यावे. यामुळे शरीराला पूर्णपणे डिटॉक्स होण्यास मदत होते आणि दिवसभर ऊर्जा टिकून राहते.
हे ड्रिंक मेटाबॉलिझम वाढवते, पोट साफ ठेवते आणि फॅट कमी करण्याची प्रक्रिया वेगाने होते. हे ड्रिंक नियमित प्यायल्याने पोटाभोवतीचा वाढलेला चरबीचा थर कमी होण्यास मदत होते.
अँटिऑक्सिडंट्समुळे त्वचा स्वच्छ, चमकदार आणि पिंपल्सपासून सुरक्षित राहते. केसांच्या मजबुतीसाठीही हे ड्रिंक उपयुक्त ठरते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.