ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
कोथिंबीर ही फक्त सजावटीसाठी नाही, तर कोथिंबीरपासून अनेक चवदार पदार्थ तयार करता येतात.
कोथिंबीर वडी हा महाराष्ट्रातील प्रसिद्ध स्नॅक्स पैंकी एक आहे. कोथिंबीर, बेसन, मसाले यांचे परफेक्ट मिश्रण असते. भाजलेली किंवा तळलेली ही वडी अप्रतिम लागते.
बारीक चिरलेली कोथिंबीर, बेसन, हिंग, तिखट, मीठ आणि थोडं पाणी एकत्र करून घट्ट मिश्रण तयार करा. हे मिश्रण तुप लावलेल्या प्लेटमध्ये पसरवा आणि १५ मिनिटे वाफवून घ्या. थंड झाल्यावर कापून घ्या आणि तव्यावर मंद आचेवर फ्राय करा.
झणझणीत आणि फ्रेश ताज्या कोथिंबिरीसोबत लसूण, हिरवी मिरची, शेंगदाणे/नारळ आणि लिंबाचा रस घालून बनलेली ही चटणी कोणत्याही पदार्थासोबत चांगली लागते. हि चटणी फ्रिजमध्ये ३ ते ४ दिवस राहते.
चटणीत थोडं तेल घातल्याने चटणीचा रंग कायम राहतो. तसेच चटणीत दही घातल्यास ती कमी तिखट व क्रीमी लागते. लहान मुलेही कोथिंबीर चटणी आवडीने खातील.
साधा भात खाऊन कंटाळा असाल तर , झटपट लंचकरिता भातात कोथिंबीरची पेस्ट मिसळून तडका द्या, एकदम सुगंधी, हलका आणि फ्रेश कोथिंबीर राईस तयार होईल. हा झटपट बनणारा कोथिंबीर राईस शाळा-ऑफिस टिफिनसाठी बेस्ट पर्याय आहे.
हा एक पारंपरिक ठेचा आहे. ताजं खोबरं, कोथिंबीर, लसूण आणि हिरवी मिरची खलबत्त्यात बारीक कुटून घ्या. खूप साधा आणि चविष्ट असा ठेचा भाकरीसोबत अप्रतिम लागतो.
गव्हाच्या पिठात कोथिंबीर, मसाले, कांदा घालून पराठ्याचे पीठ मळून घ्या. नंतर पराठे गोल लाटून तव्यावर शेकून घ्या आणि वरुन तूप लावा. हा पराठा सकाळच्या नाश्त्यासाठी भारी पर्याय आहे.
कोथिंबीर दीर्घकाळ टिकण्यासाठी पाण्याने धुऊ नका, टिश्यू पेपरमध्ये गुंडाळा आणि एअरटाइट बॉक्समध्ये ठेवा. ही ट्रिक वापरल्याने कोथिंबीर महिनाभर ताजी राहते.