ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
कोथिंबीरचा उपयोग सगळ्याच भाज्यांमध्ये केला जातो. डिश सजविण्याकरिता कोथिंबीर मोठ्या प्रमाणात वापरली जाते. कोथिंबीर दीर्घकाळ टिकून राहण्याकरिता काही सोप्या स्टेप्स आहेत त्या जाणून घ्या.
कोथिंबीरमध्ये असलेली माती धुळ आणि ओलसर कण काढण्यासाठी कोथिंबीर थंड पाण्याने चांगली धुवून घ्या.
धुतल्यानंतर कोथिंबीर चाळणीत ठेवा जेणेकरुन , कोथिंबीरमध्ये असलेले पाणी निघून जाईल. कोथिंबीरमध्ये जर ओलसरपणा राहिला तर कोथिंबीर लवकर कुजते.
जास्त जाड असलेले देठ काढून टाका. फक्त कोवळी पाने बारिक देठ ठेवा.
एका एअरटाईट बॉक्समध्ये पेपर टॉवेलची लेयर बनवा आणि यावर कोथिंबीर ठेवा. पेपर टॉवेल कोथिंबीरचा ओलसरपणा शोषून घेईल आणि जास्त काळ टिकेल.
कोथिंबीर पेपर टॉवेल वर ठेवल्यावर पुन्हा वरच्या थरावर पेपर टॉवेल ठेवा. ही पेपर टॉवेलची डबल लेयर कोथिंबीरचा ताजेपणा वाढवते.
कोथिंबीर हलक्या हाताने पसरवून ठेवा. पसरवून ठेवल्यास कोथिंबीरची पाने ताजी राहतात.
कोथिंबीरचा एअरटाईट बॉक्स फ्रिजच्या व्हेजिटेबल सेक्शनमध्ये ठेवल्यास कोथिंबीर सहज १ महिना ताजी राहिल.