ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
तवा नॉनस्टिक नसला तरी तो नॉनस्टिकसारखा वापरता येतो. जेवण बनवताना पदार्थ भांड्यांना चिकटतात हि एक मोठी समस्या आहे. पण काहि सोप्या किचन टिप्स वापरुन कोणताही तवा नॉनस्टिकसारखा न चिकटणारा बनवता येतो.
लोखंडी आयरन तव्याला हलके तेल लावून तवा ५ ते ७ मिनिटे गरम करा. यामुळे तव्यावर नैसर्गिक लेयर तयार होऊन पदार्थ तव्याला चिटकत नाही.
तव्यात २ मोठे चमचे जाड मीठ टाका आणि ५ मिनिटे गरम करून नंतर मीठ काढून टाका. हे केल्यास तवा नवीनसारखा दिसतो.
गरम तव्यावर अर्धा कांदा घासून घ्या.कांद्यातील नैसर्गिक रस तव्याला नॉनस्टिकसारखी पातळ लेयर देतो. विशेषतः नॉनस्टिक तवा डोसा, थालीपीठासाठी वापरला जातो.
तवा गरम झाल्यावर त्यावर १ चमचा तेल टाका आणि पूर्ण तव्यावर पसरवा. २ मिनिटे तेल असेच राहू द्या मग जास्त झालेले तेल काढून टाका. असे केल्यास तव्याला पदार्थ चिकटत नाही.
नारळाच्या तेलात नैसर्गिक नॉनस्टिक गुणधर्म असतात.नारळाच्या तेलाची तव्याला हलकी लेयर लावली तरी डोसा,उप्पीट यांसारखे पदार्थ चिकटत नाहीत.
खूप थंड तव्यावर पदार्थ टाकला तर तो चिकटला जातो. त्यामुळे तवा मध्यम गरम झाल्यावरच तेल,पीठ,डोसा बॅटर टाका जेणेकरुन पदार्थ चिकटला जाणार नाही.
कधीही गरम तवा थंड पाण्याने धुवू नका यामुळे तव्याची लेयर निघून जाते.
आठवड्यातून एकदा तव्याला तेल लावून तवा 10 मिनिटे गरम करा. तेलाने तव्यावर कायम नॉनस्टिक लेयर टिकते व तव्याचे आयुष्य वाढवते.