ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
फ्रिजमध्ये किंवा किचनमध्ये ठेवलेले लिंबू काहि दिवसांत सुके पडतात? लिंबाचा रस निघत नाही आणि वाया जातात? तर ह्या सोप्या टिप्स वापरून बघा.
लिंबू जास्त हवेत राहिल्यास त्यातील नैसर्गिक ओलावा बाहेर निघून जातो. यामुळे ते सुकतात आणि कडक होतात.
लिंबू एअरटाइट कंटेनरमध्ये मीठ घालून ठेवा. हा उपाय लिंबूंचा ओलावा टिकवतो आणि लिंबू ताजे राहतात.
लिंबू स्वच्छ पुसून घ्या. कंटेनरच्या तळाशी थोडं मीठ शिंपडा आणि लिंबू ठेवून वरूनही हलके मीठ शिंपडा आणि कंटेनर एअरटाइट करा.
असे केल्यास मीठ लिंबूचे नैसर्गिक मॉइश्चर लॉक करते. तसेच लिंबू 20–25 दिवस ताजे राहतात आणि सुके पडत नाहीत.
लिंबू झिपलॉक बॅगमध्ये पाण्यासोबत ठेवले तर ते जवळपास 1 महिना ताजे राहतात.
ही लिंबू ठेवण्याची कमाल ट्रिक एकदा करून बघा. लिंबू सुके पडणारच नाहीत आणि जास्त काळ टिकून राहतील.