Apple Watch: अ‍ॅपल वॉचमुळे वाचला समुद्रात बुडणाऱ्या तरुणाचा जीव, अनुभव ऐकून तुम्हीही व्हाल चकीत

Miracle at Sea: खोल समुद्रात बुडणाऱ्या एका तरुणाचे प्राण अ‍ॅपल वॉचमुळे वाचले. या तरुणाची सध्या सोशल मीडियावर चर्चा होत आहे. या घटनेमुळे सर्वजण चकीत झाले आहेत. अ‍ॅपलचे सीईओ टिम कुक यांनी देखील या घटनेवर प्रतिक्रिया दिली.
Apple Watch: अ‍ॅपल वॉचमुळे वाचला समुद्रात बुडणाऱ्या तरुणाचा जीव, अनुभव ऐकून तुम्हीही व्हाल चकीत
Apple WatchSaam Tv
Published On

Summary -

  • पुद्दुचेरीत स्कूबा डायव्हिंगदरम्यान तरुणाचा जीव अ‍ॅपल वॉचने वाचवला.

  • क्षितिज जोदापे ३६ मीटर खोलीवर अडकला होता.

  • अ‍ॅपलवॉचच्या सायरन आणि SOS फीचरमुळे तो वाचला.

  • टिम कुक यांनीही या घटनेवर आनंद व्यक्त केला.

अ‍ॅपल ही जगातील काही मोजक्या टेक कंपन्यांपैकी एक आहे जी केवळ तिच्या स्टाइल आणि ब्रँड व्हॅल्यूसाठीच ओळखली जात नाही तर या कंपनीच्या उत्पादनांमध्ये सुरक्षितता आणि जीवनरक्षक तंत्रज्ञानाचा समावेश असतो. एक अशी घटना समोर आली आहे या घटनेने हे सिद्ध केले आहे. अ‍ॅपल वॉचने एका तरुणाला मृत्यूच्या जबड्यातून वाचवले. हा तरुण समुद्रात बुडणार होता परंतु अ‍ॅपल वॉचमधील एका खास स्मार्ट फीचरच्या मदतीने त्याचा जीव वाचला. या घटनेने सर्वांना आश्चर्यचकीत केले.

Apple Watch: अ‍ॅपल वॉचमुळे वाचला समुद्रात बुडणाऱ्या तरुणाचा जीव, अनुभव ऐकून तुम्हीही व्हाल चकीत
Shocking News: स्तन वाढवण्यासाठी सर्जरी केली, काही तासांत १४ वर्षांच्या मुलीचा मृत्यू; नेमकं काय घडलं?

ही घटना सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. इतकेच नाही तर अ‍ॅपलचे सीईओ टिम कुक यांनीही या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. ही घटना पुद्दुचेरी येथे घडली. २६ वर्षीय क्षितिज जोदापे स्कूबा डायव्हिंग करत होता. दरम्यान तो खोल समुद्रात अडकला. समुद्रात अडकल्यामुळे त्याला काय करावे हेच समजत नव्हते. अखेर त्याला अॅपलने वाचवले.

Apple Watch: अ‍ॅपल वॉचमुळे वाचला समुद्रात बुडणाऱ्या तरुणाचा जीव, अनुभव ऐकून तुम्हीही व्हाल चकीत
Shocking News : तरूणीसोबत घडली विचित्र घटना, बाथरूममध्ये आंघोळीला गेली अन् कोपऱ्यातलं दृश्य बघून हादरलीच!

क्षितीजने सांगितले की, तो खोल समुद्रात ३६ मीटर खोलीवर गेला होता. यादरम्यान त्याचा बेल्ट सैल झाला. यामुळे तो समुद्राच्या पृष्ठभागाकडे वेगाने खाली जाऊ लागला. त्याला काय करावे हे कळत नव्हते. त्यामुळे तो प्रचंड घाबरला. यावेळी त्याच्या हातामध्ये असलेले अ‍ॅपल अल्ट्रा वॉचचा सायरन मोठ्याने वाजू लागला. सायरनने क्षितिजला सावध केले.

Apple Watch: अ‍ॅपल वॉचमुळे वाचला समुद्रात बुडणाऱ्या तरुणाचा जीव, अनुभव ऐकून तुम्हीही व्हाल चकीत
Amravati Shocking News: गर्लफ्रेंड- बॉयफ्रेडचं भांडण पेटलं, तरूणाने इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारण्याची दिली धमकी,VIDEO व्हायरल

दरम्यान, त्याच्या वॉचच्या स्क्रीनवर वेग कमी करण्यासाठी एक सूचना आली. जास्त वेगाने वर चढल्याने त्याच्या फुफ्फुसांना गंभीर दुखापत झाली असती. सुरुवातीला अ‍ॅपल वॉचने सतर्कतेची सूचना दिली तेव्हा क्षितिजने प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर वॉचने एक मोठा सायरन वाजवला. हे ऐकून प्रशिक्षक क्षितिजच्या मदतीला धावून आला. या घटनेनंतर अ‍ॅपलचे सीईओ टिम कुक या घटनेवर प्रतिक्रिया देत म्हणाले की, 'प्रशिक्षकाने अलार्म ऐकला आणि लगेच तुम्हाला मदत केली याचा मला खूप आनंद आहे. ही कहाणी आमच्यासोबत शेअर केल्याबद्दल धन्यवाद. निरोगी राहा.'

Apple Watch: अ‍ॅपल वॉचमुळे वाचला समुद्रात बुडणाऱ्या तरुणाचा जीव, अनुभव ऐकून तुम्हीही व्हाल चकीत
Shocking News: आधी कानाखाली पेटवली, नंतर शिव्या घातल्या, दारूच्या नशेत महिलेकडून सासूला अमानुष मारहाण; VIDEO व्हायरल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com