Amravati Shocking News: गर्लफ्रेंड- बॉयफ्रेडचं भांडण पेटलं, तरूणाने इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारण्याची दिली धमकी,VIDEO व्हायरल

Amravati Girlfriend- Boyfriend News: अमरावतीत प्रेम प्रकरणातून धक्कादायक घटना घडली. तरुणाने सहाव्या मजल्यावरून उडी मारण्याची धमकी दिली. पोलिसांच्या दोन तासांच्या प्रयत्नांनंतर तरुणाला ताब्यात घेण्यात आले.
Amravati Shocking News
Amravati Shocking NewsSaam Tv
Published On

महाराष्ट्राच्या अमरावतीमधून एक धक्कादायक घटना घडली आहे. तरूण- तरूणीमधील हे प्रेम प्रकरण समोर आलं आहे. ज्यामध्ये तरूणाने तरूणीला आत्महत्या करण्याची धमकी दिली आहे.या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. ज्यामुळे तरूणाच्या या धाडसाने सर्वांना धक्काच बसला आहे.

Amravati Shocking News
Viral Video: शाळा आहे की डान्स बार? रात्रभर महिलांना नाचवलं, लहान मुलांसमोर अश्लिल हावभाव; VIDEO व्हायरल

मिळालेल्या माहितीनुसार, एका तरूणाचा त्याच्या प्रेयसीसोबत वाद झाला होता. या तरूणीला तरूण त्रास देत होता यामुळे तिने त्याच्याकडे दुर्लक्ष केले. मुलीने त्याच्याविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी पोलिस ठाण्यात धाव घेतली. याच गोष्टींचा राग मनात धरून तरूण आत्महत्या करण्यासाठी इमारतीच्या सहाव्या मजल्यावर गेला आणि उडी मारण्याची धमकी देत होता.

हे संपूर्ण प्रकरण तेव्हाच समोर आले जेव्हा त्याने तरूणीला व्हिडीओ कॉल केला . सहाव्या मजल्यावर उडी मारण्यासाठी तरूण उतरला आहे. त्याने तरूणीला उडी मारत असल्याची धमकी दिली. तरूणीने पोलिसात तक्रार दिल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तरूणाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पण त्याने ऐकण्यास नकार दिला.

जवळपास, दोन तासांच्या समजूतीनंतर पोलिसांनी या तरूणाला ताब्यात घेतले आहे. सोशल मीडियावर या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर अनेक नेटकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकदा तरूण- तरूणीच्या भांडणाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात.

Amravati Shocking News
Vijay Thalapathy Rally: बत्ती गूल होताच घडली चेंगराचेंगरी, ३१ जणांचा मृत्यू ; अभिनेत्याच्या सभेत धडकी भरवणारी गर्दी, Video Viral

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com