फ्लोरिडामधील किनारपट्टीचा एक भाग "ट्रेझर कोस्ट" म्हणून ओळखला जातो. येथे असंख्य जहाजांचे तुकडे सापडले आहेत. ज्यामध्ये खजिना लपला आहे. पुन्हा एकदा या जहाजांच्या ढिगाऱ्यांमध्ये लपलेला खजिना सापडला आहे. एका वृत्तानुसार जहाजांच्या ढिगाऱ्यांचा शोध घेणाऱ्या कंपनीच्या पाणबुडी पथकाने एका महत्त्वाचा खजिना शोधला आहे.
31 जुलै 1715 मध्ये, अमेरिकन वसाहतींमधून मौल्यवान वस्तूंची वाहतूक करताना स्पॅनिश नौदलाचा ताफा एका वादळाने उद्ध्वस्त झाला. त्या काळापासून हरवलेला खजिना एका स्पॅनिश जहाजाच्या ढिगाऱ्यात लपलेला होता. समुद्रात सापडलेला खजिना आठ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचा आहे. फ्लोरिडाच्या अटलांटिक किनाऱ्यावर 1000 हून अधिक सोने आणि चांदीची नाणी सापडली आहेत. जी बोलिव्हिया, मेक्सिको आणि पेरू या स्पॅनिश वसाहतींमध्ये बनवली गेली होती असे मानले जाते. सोने आणि चांदीच्या नाण्यांवर टाकसाळच्या खुणा आणि तारखा कोरलेल्या आहेत.
खजिना स्पेनला परत आणला जात असताना वादळ्याच्या घटनेत खजिना समुद्रात वाहून गेला. मात्र नाण्यांवरील माहितीमुळे इतिहासकार आणि संग्राहकांना नवीन माहिती मिळू शकते. हा शोध केवळ खजिन्याबद्दल नाही तर त्यामागील कथांबद्दल देखील आहे. प्रत्येक नाणे हा इतिहासाचा एक तुकडा आहे, जो स्पॅनिश साम्राज्याच्या सुवर्णकाळात जगलेल्या, काम करणाऱ्या आणि समुद्रपर्यटन करणाऱ्या लोकांशी प्रत्यक्ष संबंध जोडतो. एकाच वेळी १००० नाणी सापडणे हे दुर्मिळ आणि असाधारण आहे, अशी प्रतिक्रीया शोध घेण्याची कंपनीने दिली आहे.
फ्लोरिडाच्या कायद्यानुसार, राज्याच्या मालकीच्या जमिनीवर किंवा राज्याच्या पाण्यात राहिलेला कोणताही खजिना किंवा इतर ऐतिहासिक कलाकृती राज्याच्या मालकीच्या आहेत. तथापि, शोधकांना त्यांचा शोध घेण्याची परवानगी दिली जाऊ शकते. कायद्यानुसार, पुनर्प्राप्त केलेल्या पुरातत्वीय साहित्यापैकी सुमारे २०% साहित्य सार्वजनिक प्रदर्शनासाठी राखून ठेवले पाहिजेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.