Shocking News : तरूणीसोबत घडली विचित्र घटना, बाथरूममध्ये आंघोळीला गेली अन् कोपऱ्यातलं दृश्य बघून हादरलीच!

Noida Crime News : नोएडातील शाहपूर गावात धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका तरुणीच्या बाथरूममध्ये शेजाऱ्याने छुपा कॅमेरा बसवला होता. या प्रकरणी तरुणीने आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
Shocking News : तरूणीसोबत घडली विचित्र घटना, बाथरूममध्ये आंघोळीला गेली अन् कोपऱ्यातलं दृश्य बघून हादरलीच!
Noida Crime NewsSaam Tv
Published On
Summary
  • नोएडातील शाहपूर गावात तरुणीच्या बाथरूममध्ये शेजाऱ्याने छुपा कॅमेरा बसवला होता.

  • आरोपी रामानंद हा इलेक्ट्रिशियन असून तरुणीच्या शेजारीच राहतो.

  • तरुणीला सापडलेल्या एसडी कार्डवर आरोपीचे फोटो-व्हिडिओ आढळले.

  • तरुणीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी फरार आहे.

नोएडामध्ये धक्कदायक घटना घडली आहे. नोएडाच्या सेक्टर १२६ पोलीस स्टेशन परिसरातील शाहपूर गावात भाड्याच्या घरात राहणाऱ्या एका तरुणीला दुसऱ्या भाडेकरूने तिच्या बाथरूममध्ये छुपा कॅमेरा बसवल्याचे आढळून आल्याची घटना समोर आली आहे. छुपा कॅमेरा सापडल्यानंतर महिलेने पोलिसांना याची तक्रार केली. दरम्यान गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी फरार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला एका खाजगी कंपनीत काम करते आणि शाहपूर गावात भाड्याच्या खोलीत राहते. तिचे लवकरच लग्न होणार आहे. सोमवारी ती आंघोळ करण्यासाठी बाथरूममध्ये गेली तेव्हा तिला बाथरूमच्या खिडकीजवळ एक छुपा कॅमेरा दिसला. यामुळे ती घाबरली. तिने कॅमेरा काढून स्वतःच्या खोलीत ठेवला. संध्याकाळी कामावरून घरी आल्यावर तिने छुपा कॅमेरा तपासला तेव्हा तिला शेजारच्या भाडेकरू रामानंदचे फोटो आणि व्हिडिओ एसडी कार्ड चिपवर आढळले.

Shocking News : तरूणीसोबत घडली विचित्र घटना, बाथरूममध्ये आंघोळीला गेली अन् कोपऱ्यातलं दृश्य बघून हादरलीच!
Uber Driver Viral Video : 'मी पोलिसांना घाबरत नाही जा...', आधी महिला प्रवाशांना शिवीगाळ, नंतर मारण्यासाठी धावला; उबर चालकाचा VIDEO व्हायरल

आरोपी रामानंद हा उत्तर प्रदेशातील संत कबीर नगरचा रहिवासी आहे आणि तो इलेक्ट्रिशियन म्हणून काम करतो. महिलेला मिळालेल्या एसडी कार्डवर रामानंद महिलेच्या बाथरूमच्या बाहेर कॅमेरा बसवतानाचे व्हिडिओ आणि फोटो देखील सापडले. या घटनेने महिलेच्या पायाखालची जमीन हादरली. तिने तातडीने पोलीस ठाणे गाठले.

Shocking News : तरूणीसोबत घडली विचित्र घटना, बाथरूममध्ये आंघोळीला गेली अन् कोपऱ्यातलं दृश्य बघून हादरलीच!
Maharashtra News : दिवाळीसाठी एसटीच्या ९०० विशेष फेऱ्या, कुठून किती बस धावणार?

आरोपी रामानंद हा महिलेच्याच इमारतीत राहतो. महिलेचा आरोप आहे की रामानंदने तिचे व्हिडिओ काढण्यासाठी तिच्या खाजगी बाथरूममध्ये छुपा कॅमेरा बसवला होता. महिलेने याबद्दल त्याला विचारपूस केली तेव्हा त्याने ते कबूल केले. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु केला असून आरोपी रामानंद फरार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com