Astronomer CEO Video: सीईओ-एचआरचा 'तो' व्हिडिओ व्हायरल; अफेअर जगजाहीर झालं अन् हातातील नोकरी गेली

Astronomer CEO And HR Video Viral : कोल्डप्ले कॉन्सर्टदरम्यान किस कॅममध्ये सीईओ आणि एचआर व्हिडिओ व्हायरल झाला. अन् व्हायरल व्हिडिओमुळे सीईओचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर जगजाहीर झालं.
Astronomer CEO Video
Astronomer CEO And HR Video Viralsaam Tv
Published On

एआय कंपनी ॲस्टॉनॉमरचे सीईओ अँडी बायरन यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. नोकरी गमावण्याचं कारण ठरलंय त्यांचा एचआर सोबतचा व्हायरल झालेला व्हिडिओ. सोशल मीडियावर त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिलाय. ‘कोल्डप्ले’ कॉन्सर्टदरम्यान सीईओ अँडी बायरन आणि कंपनीच्या एचआर क्रिस्टिन कॅबट यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यामुळे त्यांना सीईओ पदाचा राजीनामा द्यावा लागला. (Astronomer CEO Andy Byron resign after Coldplay concert video went viral)

Astronomer CEO Video
China–India relations: बेडकुळ्या फुगवणारा चीन भारताशी जवळीक का वाढवतोय? असू शकतात 'ही' कारणे

बॉस्टनजवळ कोल्डप्ले कॉन्सर्टचा कार्यक्रम झाला. त्यातील किस कॅमेऱ्यानं दोघेही रोमँटिक अंदाज असताना टिपलं होतं. त्यानंतर अँडी आणि क्रिस्टिन यांचं अफेअर जग जाहीर झालं. कॅमेरा आपल्यावर फोकस झाल्याचं समजताच ते दोघेही आपला तोंड लपवण्याचा प्रयत्न करताना दिसत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय.

Coldplay हा जगविख्यात म्युझिक बँड आहे. कॉन्सर्टदरम्यान अनेकदा प्रेक्षकांवर कॅमेरा फोकस करण्यात येत असतो. बॉस्टनजवळील कॉन्सर्टमध्ये जेव्हा अँडी आणि क्रिस्टिन एकमेकांसोबत रोमँटिक होत होते, त्याचवेळी कॅमेरा त्यांच्यावर गेला. कॉन्सर्टमधल्या कॅमेऱ्याने त्यांना टिपलं होतं आणि दोघं अचानक मोठ्या स्क्रीनवर झळकले. त्यांनी त्यांनी लगेचच तोंड लपवण्याचा प्रयत्न केला. हे पाहून बँडचा मुख्य गायक ख्रिस मार्टिन म्हणाला, “एकतर या दोघांचं अफेअर असेल किंवा ते कॅमेरापासून खूप लाजत आहेत.”

अँडी आणि क्रिस्टिनचा हा व्हिडीओ वाऱ्याच्या वेगाने सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यावर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येऊ लागल्या. अखेर शनिवारी अँडी यांच्या कंपनीने एक निवेदन जारी करत त्यांच्या राजीनाम्याची माहिती दिलीय. ‘आमच्या लीडरकडून चांगली वागणूक आणि जबाबदाऱ्या पार पडणं अपेक्षित आहे. हे निकष पूर्ण झाले नाहीत. त्यामुळे अँडी बायरन यांनी राजीनामा दिलाय. त्यांचा राजीनामा संचालक मंडळाने स्वीकारला असल्याचे कंपनीने आपल्या निवेदनात म्हटलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com