Royal Enfield Classic 350 : रॉयल एनफील्ड 350 चं ३८ वर्षांपूर्वीचं बिल व्हायरल; किंमत वाचून डोक्याला हात लावाल

Royal enfield classic 350 old bill : रॉयल एनफील्ड 350 चं ३८ वर्षांपूर्वीचं बिल व्हायरल होतंय. या बिलावरील किंमत वाचून आश्चर्य वाटेल .
Royal Enfield
Royal Enfield Classic 350Saam tv
Published On

रॉयल एनफील्ड भारतातील प्रसिद्ध कंपनी आहे. रॉयल एनफील्ड कंपनीची बाईक खरेदी करण्याचं अनेकांचं स्वप्न असतं. भारतातील फार कमी लोक रॉयल एनफील्ड बुलेट खरेदी करताना दिसतात. लुक्स आणि फीचर्सच्या बाबतीत रॉयल एनफील्ड बुलेट बेस्ट आहे. रॉयल एनफील्डच्या बाईकची किंमत १,५०,००० रुपयांपासून सुरु होते. या बाईकचे अनेक मॉडेल बाजारात उपलब्ध आहेत.

Royal Enfield
Ladki Bahin Yojna : लाडकी बहीण योजना बंद होणार का? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात विषय संपवला

रॉयल एनफील्डच्या बाईकचं ३८ वर्ष जुनं बिल व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर रॉयल एनफील्ड बाईकच्या बिलावरील किंमत चर्चेचा विषय ठरला आहे. व्हायरल होणारं बिल हे १९८६ सालातील आहे. सोशल मीडियावरील व्हायरल बिल हे रॉयल एनफील्ड क्सासिक ३५०चं आहे. या बिलावरील रॉयल एनफील्ड क्लासिक ३५० बाईकची किंमत जाणून चकीत व्हाल.

Royal Enfield
Shocking : शारीरिक संबंधादरम्यान जिम ट्रेनरच्या पत्नीचा मृत्यू? त्या रात्री नेमकं काय घडलं? वाचा सविस्तर

३८ वर्षांपूर्वी रॉयल एनफील्ड क्लासिक ३५० बुलेटची किंमत किती होती, जाणून घेऊयात. रॉयल एनफील्ड क्लासिक ३५० बाईकची किंमत सध्याच्या घडीला जवळपास २.५ लाखापर्यंत पोहोचली आहे. याच बाईकची किंमत १९८६ साली फक्त १८७०० रुपये इतकी होती. १९८६ सालानंतर ही बाईक खूप अपडेट झाली आहे.

Royal Enfield
Hadapsar-Jodhpur Express : रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! पुण्यातून धावणार नवीन एक्स्प्रेस ट्रेन, पाहा संपूर्ण वेळापत्रक

रॉयल एनफील्ड क्लासिक ३५० बाईक लोकांमध्ये खूप प्रसिद्ध आहे. ही बाईक लुक्स, फीचर्स आणि मायलेजच्या बाबतीत खूप खास आहे. लोकांची आवडती बाईक ६ रंगात उपलब्ध आहे. ही बुलेटचा मायलेज ३७ किलोमीटर प्रति लीटर आहे. आजही अनेक जण मोठ्या आवडीने रॉयल एनफील्ड क्लासिक ३५० बाईक खरेदी करतात.

Royal Enfield
Royal Enfield Hunter 350 : 'रॉयल एनफील्ड'चा धमाका! मोठ्या बदलासह सर्वात स्वस्त बुलेट लाँच, किंमत फक्त...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com