Shruti Kadam
उमलिंग ला पास लडाखच्या पूर्व भागात, चिसुमले आणि डेमचोक गावांना जोडणाऱ्या मार्गावर स्थित आहे. या रस्त्याची एकूण लांबी ५२ किलोमीटर आहे. हा रस्ता समुद्रसपाटीपासून ५,७९८ मीटर (१९,०२४ फूट) उंचीवर आहे, त्यामुळे तो जगातील सर्वात उंच बाईक राईडसाठी योग्य रस्ता ठरतो.
या रस्त्याचे बांधकाम सीमा सड़क संगठन (BRO) ने केले आहे. या प्रकल्पाचा मुख्य उद्देश सीमावर्ती भागांमध्ये वाहतूक सुलभ करणे आणि स्थानिक लोकांना सुविधा उपलब्ध करून देणे हा आहे. या रस्त्यामुळे लडाखच्या दुर्गम भागांमध्ये पोहोचणे सोपे झाले आहे.
उमलिंग ला पासच्या आधी, जगातील सर्वात उंच रस्त्याचा विक्रम बोलिवियामधील सेरो उतुरुंकू ज्वालामुखीच्या रस्त्याच्या नावावर होता. तो रस्ता समुद्रसपाटीपासून ५,७७७ मीटर (१८,९५३ फूट) उंचीवर आहे.
उमलिंग ला पासचा रस्ता स्थानिक लोकांसाठी वरदान ठरला आहे. या रस्त्यामुळे लेह, चिसुमले आणि डेमचोक यांच्यातील अंतर कमी झाले आहे. ज्यामुळे प्रवासाचा वेळ आणि खर्च दोन्ही कमी झाले आहेत.
उमलिंग ला पास हा साहसप्रेमी पर्यटकांसाठी एक आकर्षण ठरला आहे. या रस्त्यावरून प्रवास करताना हिमालयाच्या अद्भुत सौंदर्याचा अनुभव घेता येतो.
उमलिंग ला पासच्या उंचीवर वातावरण अत्यंत कठीण असते. थंड हवामान, कमी ऑक्सिजन आणि अनिश्चित हवामानाच्या परिस्थितीमुळे या रस्त्यावर बाईक चालवणे रिस्की आहे.
उमलिंग ला पासच्या रस्त्यामुळे भारताने जागतिक स्तरावर एक महत्त्वपूर्ण स्थान प्राप्त केले आहे.