Success Story: IIT मधून शिक्षण; ३५ लाखांची नोकरी धुडकावली अन् दिली UPSC; IPS अर्चित चांडक यांचा प्रेरणादायी प्रवास

Success Story Of IPS Archit Chandak: ३५ लाखांच्या पॅकेजची नोकरी सोडली अन् यूपीएससी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. अर्चित चांडक यांचा प्रेरणादायी प्रवास वाचा.
Archit Chandak
Archit ChandakSaam Tv
Published On

आयुष्यात यशस्वी होण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. यूपीएससी ही देशातील सर्वात अवघड परीक्षा आहे. या परीक्षेत यश मिळवण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. अनेकजण लाखोंच्या पगाराची नोकरी सोडून यूपीएससी परिक्षेची तयारी करु शकतात.असंच काहीसं अर्चित चांडक यांनी केलं. त्यांनी लाखोंच्या पगाराची नोकरी सोडून यूपीएससी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. (Success Story)

अर्चित चांडक यांनी २०१२ मध्ये देशातील अवघड परीक्षा जेईई क्रॅक केली. त्यानंतर त्यांनी आयआयटी दिल्लीत अॅडमिशन घेतले. त्यांना वार्षिक ३५ लाखांच्या पॅकेजची नोकरीची ऑफर मिळाली. परंतु त्यांनी ही नोकरी स्विकारली नाही.त्यांनी आयपीएस होण्याचे स्वप्न पूर्ण केले. (Success Story Of IPS Archit Chandak)

Archit Chandak
Success Story: १६ व्या वर्षी ऐकण्याची क्षमता गमावली, परीक्षेच्या आदल्या दिवशी १०३ ताप; पहिल्याच प्रयत्नात क्रॅक केली UPSC; IAS सौम्या शर्मा यांची कहाणी

आयपीएस अर्चित चंडक हे मूळचे नागपूरचे रहिवासी. त्यांनी बिपी विद्या मंदिर येथून शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर आयआयटी दिल्ली येथे इंजिनियरिंगसाठी अॅडमिशन घेतले.त्यांना बीटेक करताना लक्षात आले की आपल्याला सरकारी अधिकारी होऊन देशसेवा करायची आहे. चांडक यांना इंटर्नशिपच्या काळात जपानी कंपनीकडून ३५ लाखांचे पॅकेजच्या नोकरीची ऑफर मिळाली. परंतु त्यांनी यूपीएससी दिली.

Archit Chandak
Success Story: आई-वडील मजुरी करायचे, वॉर्डन म्हणून काम करताना केली UPSC ची तयारी; पहिल्या आदिवासी IAS श्रीधन्या सुरेश यांची यशोगाथा

त्यांनी २०१८ साली यूपीएससी परिक्षेत १८४ रँक मिळवली. त्यांनी आयपीएस बनण्याचे स्वप्न पूर्ण केले.त्यांना खेळाची प्रचंड आवड आहे. ते सोशल मीडियावरदेखील सक्रिय आहेत. त्यांनी आयएएस सौम्या शर्मा यांच्याची लग्न केले. त्यांनीदेखील यूपीएससी परिक्षेत चांगले यश मिळवले होते.

लाखो रुपयांच्या पगाराची नोकरी मिळूनही अर्चित चंडक यांनी यूपीएससी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. त्यांनी देशसेवा करण्यासाठी यूपीएससी परीक्षा दिली. नागपूरच्या अर्चित चंडक यांनी कहाणी सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे.

Archit Chandak
Success Story: डॉक्टर होण्याचे स्वप्न भंगले, पण आशा सोडली नाही; 4 महिन्यात UPSC क्रॅक, IAS तरुणी पांडेंची यशोगाथा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com