Nagpur Metro: नागपूर मेट्रो २,१५२७ कोटींचे अर्थसहाय्य; ४३.८ किमी मार्ग, काय होणार फायदा?

Nagpur Metro 2nd Phase : नागपूर मेट्रो प्रकल्प टप्पा-२ ला चालना मिळाल्यामुळे शहरासह परिसराचा अधिक गतीने विकास होणार , असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणालेत. नागपूर मेट्रो प्रकल्प टप्पा-२ साठी १५२७ कोटींचे अर्थसहाय्य देण्यात आले आहे.
 Nagpur Metro
Nagpur Metro 2nd Phase google
Published On

नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामाला गती मिळणार आहे. नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याला चालना देण्यासाठी आशियाई विकास बँकेकडून १५२७ कोटी रुपयांचे (२०० मिलियन डॉलर) अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत विधानभवनातील मंत्रिमंडळ सभागृहात यासंदर्भात आज सामंजस्य करार करण्यात आला. या प्रकल्पामुळे नागपूर शहरासह परिसराच्या विकासाला आणखी गती मिळणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर आणि आशियाई विकास बँकेच्या संचालक मिओ ओका यांनी अर्थसहाय्याच्या करारावर सह्या केल्या आहेत. नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाच्या टप्पा-२ साठी आशियाई विकास बँक आणि युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँक (EIB) यांच्याकडून एकूण ३,५८६ कोटी रुपयांचा वित्तपुरवठा केला जाणार आहे. त्यापैकी १५२७ कोटी रुपये आशियाई विकास बँकेकडून मिळणार आहे. त्यासंदर्भातील करार आज करण्यात आलाय.

महामेट्रोला हा वित्तपुरवठा जपानी येन या चलनामध्ये मिळणार आहे. त्यामुळे कर्जावर तुलनेने कमी व्याज द्यावे लागणार आहे. महा मेट्रोला या कर्जाची रक्कम केंद्रीय गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाच्या माध्यमातून उपलब्ध केली जाणार आहे.

जाणून घ्या मार्ग

दरम्यान नागपूर शहरात मेट्रो रेल्वेचे जाळे तयार करण्यात आले आहे. मेट्रोचा दुसरा टप्पा डिसेंबर २०२७ पर्यंत पूर्ण होणार आहे. तसेच केंद्र सरकारने मंजूर केलेल्या या दुसऱ्या टप्प्यात पहिल्या टप्प्यातील चार मार्गांचा अजून विस्तार करण्यात आलाय.

 Nagpur Metro
Viral Video: अर्रर्र! दिल्ली मेट्रोत तरुण अन् वयस्कर व्यक्तीमध्ये जोरदार हाणामारी; VIDEO पाहून नेटकरी हैराण

नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्प टप्पा-२ हा खापरी ते एमआयडीसी इएसआर दरम्यान १८.५ किलोमीटर, ऑटोमोटिव्ह स्क्वेअर ते कन्हान नदी दरम्यान १३ किलोमीटर, प्रजापती नगर ते ट्रान्सपोर्टनगर दरम्यान ५.६ किलोमीटर आणि लोकमान्यनगर ते हिंगणा दरम्यान ६.७ किलोमीटर असा एकूण ४३.८ किलोमीटरचा असणार आहे. या मेट्रो प्रकल्पाचा लाभ नागपूर परिसरातील १० लाख रहिवाशांना होणार आहे.

 Nagpur Metro
Metro Job: मेट्रोत नोकरीची सुवर्णसंधी, पगार १,२०,००० रुपये, पात्रता काय? जाणून घ्या

या मेट्रो मार्गामुळे अनेक प्रवाशांना फायदा होणार आहे. बुटीबोरी आणि हिंगणापर्यंत मेट्रोच्या विस्ताराने प्रवासी संख्या मोठ्या प्रमाणात वाढेल अशी अपेक्षा आहे. कारण बुटीबोरी आणि हिंगणा हे दोन्ही औद्योगिक क्षेत्र आहेत. येथील विविध कंपन्यांमध्ये नागपूर शहरातील कर्मचारी मोठ्या संख्येने ये-जा करत असतात. दरम्यान मेट्रोच्या पहिल्या टप्प्यामुळे शहरातील अनेकांना प्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण झाल्य. दुसऱ्या टप्प्यातही अशाप्रकारे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण होतील असतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com