Success Story: १६ व्या वर्षी ऐकण्याची क्षमता गमावली, परीक्षेच्या आदल्या दिवशी १०३ ताप; पहिल्याच प्रयत्नात क्रॅक केली UPSC; IAS सौम्या शर्मा यांची कहाणी

Success Story Of IAS Saumya Sharma: सौम्या शर्मा यांनी वयाच्या १६ व्या वर्षी ऐकण्याची क्षमता गमावली.तरीही पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा क्रॅक केली. त्यांनी सेल्फ स्टडी करुन हे यश मिळवले आहे.
Success Story
Success StorySaam Tv
Published On

यूपीएससी ही देशातील सर्वात अवघड परीक्षा आहे. यूपीएससी परीक्षा क्रॅक करण्याचे अनेकांचे स्वप्न असते. परंतु हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत करावी लागते.आयुष्यात कितीही अडथळे आले तरीही आपण मेहनत करायची. असंच काहीसं सौम्या शर्मा यांच्यासोबत झालं.

सौम्या शर्मा यांनी नेहमी जीवनाच्या सकारात्मकतेने बघितलं. वयाच्या १६ व्या वर्षी ९० ते ९५ टक्के ऐकण्याची क्षमता कमावली. परंतु तरीही त्यांनी खूप मेहनत केली. त्या डिसॅबल कॅटेगरीमधून फॉर्म भरु शकत होत्या. तरीही त्यांनी सामान्य प्रवर्गातून अर्ज केला आणि यश मिळवले. सौम्या यांनी वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी ऐकण्याची क्षमता गमावली. तरीही त्यांनी आयुष्य जगायचे ठरवले. त्या हियरिंग ऐडच्या मदतीने ऐकायच्या. सुरुवातीला त्यांना या गोष्टीचा खूप त्रास झाला. मात्र, तरीही त्यांनी प्रयत्न सोडले नाही.

Success Story
Success Story: बुटकी म्हणून चिडवलं, पण हार मानली नाही, पहिल्या प्रयत्नात UPSC क्रॅक; IAS आरती डोगरा यांची यशोगाथा

सौम्या या अभ्यासात खूप हुशार होत्या. त्यांनी शाळेनंतर नॅशनल लॉ स्कूलमधून शिक्षण घेतले. त्या कायद्याचे शिक्षण घेत होत्या. पदवीच्या शेवटच्या वर्षात असताना त्यांनी यूपीएससी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. त्यांनी वयाच्या २३ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा क्रॅक केली.

सौम्या यांनी २०१७ साली जेव्हा प्रिलिम्स परीक्षा देण्याचे ठरवले तेव्हा परिक्षेसाठी केवळ ४ महिने बाकी होती. त्यांनी या काळात खूप अभ्यास केला. त्यांनी स्वतः वेगवेगळ्या विषयांचे नोट्स काढले होते. या नोट्सच्या मदतीने त्यांना फायदा झाला.त्यांना लहानपणापासूनच वृत्तपत्र वाचायची आवड होती. याचा त्यांना खूप फायदा झाला.

Success Story
Success Story: दोन मुलांना एकटीने वाढवलं, ४५ व्या वर्षी व्यवसायात; आज १२०० कोटींच्या मालकीण, वाचा सक्सेस स्टोरी

सौम्या यांना मेन्स परिक्षेच्या आधी खूप जास्त ताप आला होता. या काळात त्यांना रिविजन करण्यासाठीही वेळ मिळाला नाही. शेवटच्या एका आठवड्यात त्यांची तब्येत खूपच खराब झाली होती. त्या खूप आजारी पडल्या होत्या. त्यांना १०२, १०३ ताप होता. त्यांनी दिवसाला २-३ सलाइन लावायचे. परंतु तरीही त्यांनी हार मानली नाही. त्यांनी प्रयत्न केले आणि परीक्षा दिली. पहिल्याच प्रयत्नात त्यांना यश मिळाले.

Success Story
Success Story: आर्मी अधिकाऱ्याची लेक, पहिल्याच प्रयत्नात UPSC क्रॅक; २२ व्या वर्षी IAS; चंद्रज्योती यांचा प्रेरणादायी प्रवास

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com