

IAS कस्तुरी पांडा यांचा प्रेरणादायी प्रवास
दुसऱ्या प्रयत्नात यूपीएससी क्रॅक
अवघ्या २३व्या वर्षी झाल्या IAS
यूपीएससी ही देशातील सर्वात अवघड परीक्षा आहे. यूपीएससी परीक्षा पास करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. अनेकजण कोचिंग क्लासेस लावून परीक्षेचा अभ्यास करतात. दिवसरात्र अभ्यास करुन अनेक तरुण यूपीएससी परीक्षेत यश मिळवतात. परंतु काही तरुणांनी कोणत्याही कोचिंगशिवाय यूपीएससी परीक्षा पास केली आहे. यामध्ये ओडिशाच्या कस्तूरी पांडा यांचेही नाव आहे.
अवघ्या २३व्या वर्षी IAS अधिकारी (IAS Kasturi Panda Crack UPSC At age of 23)
कस्तूरी पांडा यांनी वयाच्या अवघ्या २३व्या वर्षी यूपीएससी परीक्षा पास केली आहे. त्यांनी ऑल इंडिया रँक ६७ प्राप्त केली आहे. त्यांनी आपले आयएएस होण्याचे स्वप्न पूर्ण केले.
कस्तूरी पांडा या मूळच्या ओडिशाच्या रहिवासी आहेत. त्यांनी एनआयटी राउरकेला येथून कॉम्प्युटर सायन्समध्ये बी.टेक केले. अभियांत्रिके शिक्षण घेत असतानाच त्यांना प्रशासकीय सेवेत जाण्याची इच्छा झाली. त्यांनी नोकरी न करता यूपीएससी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयात कुटुंबानेही त्यांना साथ दिली.
पहिल्या प्रयत्नात अपयश
कस्तूरी यांनी पहिल्या प्रयत्नान मेन्स परीक्षा पास केली. परंतु मुलाखतीत त्यांना अपयश मिळाले. परंतु त्यांनी या अपयशाने हार मानली नाही. त्यांनी ओडिशा राज्य सेवा आयोगाची परीक्षा दिली. त्यांनी या परीक्षेत राज्यात १४वी रँक मिळवली. मात्र, त्यांचे आयएएस होण्याचे स्वप्न होते.
कस्तूरी पांडा यांनी पुन्हा एकदा यूपीएससी (UPSC) परीक्षेची तयारी केली. त्यांनी सेल्फ स्टडी केली. त्यांनी आपल्या जिद्दीच्या या सातत्याच्या जोरावर यूपीएससी परीक्षा पास केली आहे. त्यांचा हा प्रवास अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.