Success Story: १७ वेळा फेल, हार नाही मानली, क्रॅक केली UPSC; ड्रायव्हरचा लेक झाला IPS अधिकारी

Success Story of IPS Vivek Yadav: विवेक यादव यांनी एकदा नव्हे तर दोनदा यूपीएससी परीक्षा पास केली आहे. १७ परीक्षांमध्ये त्यांना अपयश आले होते तरीही त्यांनी हार मानली नाही.
Success Story
Success StorySaam tv
Published On
Summary

IPS विवेक यादव यांचा प्रेरणादायी प्रवास

१७ परीक्षांमध्ये अपयश

दृढ निश्चयाने एकदा नव्हे तर दोनदा क्रॅक केली यूपीएससी

यूपीएससी परीक्षा पास करुन सिव्हिल सर्व्हिसमध्ये काम करण्याचे अनेकांचे स्वप्न असते. सरकारी विभागात चांगल्या पदावर काम करण्यासाठी अनेकजण खूप मेहनत करतात. दिवसरात्र एक करुन यूपीएससी परीक्षेचा अभ्यास करतात. असंच काहीसं विवेक यादव यांनी केलं. त्यांनी यूपीएससी परीक्षा पास करत आयपीएस पदाला गवसणी घातली आहे. त्यांचा हा प्रवास सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे.

Success Story
Success Story: शिक्षणासाठी घरापासून ९ वर्षे लांब, सलग ४ वेळा अपयश, पाचव्या प्रयत्नात UPSC क्रॅक; सिक्युरिटी गार्डचा मुलगा होणार सरकारी अधिकारी

१७ वेगवेगळ्या परीक्षांमध्ये नापास

विवेक यादव यांनी याआधी १७ स्पर्धा परीक्षा दिल्या होत्या. त्यात त्यांना अपयश मिळाले होते. तरीही त्यांनी हार मानली नाही. विवेक यादव यांचे वडील नवलसिंह यादव चंदेरी नगरपालिकेत ड्रायव्हर म्हणून कार्यरत होते. त्यांची आई अंगणवाडी सेविका होती. याचसोबत त्या घरी शिलाईचे काम करायच्या. यातून कुटुंबाला मदत करायच्या. आर्थिक परिस्थिती बिकट असतानाही त्यांनी खूप मेहनतीने यश मिळवले. त्यांनी यूपीएससी २०२५ मध्ये ४८७ रँक प्राप्त केली.

विवेक यादव यांना यूपीएससी परीक्षा पास करण्यासाठी खूप संघर्षातून जावे लागले.याआधी अनेक परीक्षांमध्ये त्यांना अपयश मिळाले होते. तरीही त्यांनी हार मानली नाही. याचा परिणाम असाल झाला की त्यांनी यूपीएससी परीक्षा पास केली. त्यांनी एकदा नव्हे तर दोनदा परीक्षा पास केली. त्यांनी आपल्या परीक्षेबाबत एका कागदावर सर्व माहिती लिहली आहे.

Success Story
Ranveer Singh : 'धुरंधर 2'ची Success पार्टी रणवीर सिंगने गाजवली; fa9la गाण्यावर बेभान होऊन नाचला, VIDEO होताय तुफान व्हायरल

विवेक यांच्या यशाचे कारण त्यांचे आईवडील आहेत. त्यांना आपल्या आईवडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे होते. विवेक यादव यांची निवड असिस्टंट कमिश्नर म्हणून झाली. ते लखनऊ येथे ट्रेनिंग करत होते. परंतु त्यांनी ट्रेनिंगच्या काळात यूपीएससी परीक्षेचा अभ्यास केला. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले. त्यांनी पाचव्या प्रयत्नात चांगली रँक प्राप्त केली. त्यांची आयपीएस पदासाठी निवड झाली.

Success Story
Success Story: ४ गुंठे जमिनीतून ५ लाखांचे उत्पन्न; पुदिन्याच्या शेतीतून शेतकरी मालामाल; बीडच्या शेतकऱ्याचा प्रवास वाचाच

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com