Anganwadi Worker : अंगणवाडी सेविकांनी उपसलं संपाचं हत्यार; 'या' प्रमुख ८ मागण्या

Maharashtra Anganwadi Sevika Strike News : देशभर अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनी काही प्रमुख मागण्यांसाठी देशव्यापी संप पुकारला आहे. या संपाचा फटका लाखो चिमुकल्यांच्या पोषण आहारावर झाला आहे.
Maharashtra Anganwadi Sevika Strike News
Maharashtra Anganwadi Sevika Strike NewsSaam Tv
Published On
Summary
  • देशभर अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांचा संप

  • हजारो अंगणवाडी केंद्रांना टाळे, पोषण आहार बंद

  • वेतनवाढ, पेन्शन आणि शासकीय दर्जाची प्रमुख मागणी

  • डिजिटल बहिष्कार म्हणून पोषण ट्रॅकर ॲप बंद

  • लाखो लहान मुले पोषक आहारापासून वंचित

अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनी आज देशव्यापी संप पुकारला आहे. या संपामुळे देशभरातील अंगणवाडी केंद्रांना आज टाळे लागले आहे. आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी पोषण ट्रॅकर ॲप बंद ठेवत कर्मचाऱ्यांनी डिजिटल बहिष्कार टाकला आहे. परंतु, या लढ्यात एक विदारक दृश्य पाहायला मिळाले.

अंगणवाडी सेविकांनी त्यांच्या प्रमुख मागण्यांसाठी आज देशव्यापी संप पुकारला असून याचा फटका हजारो विद्यार्थ्यांना बसला आहे. अंगणवाडीला टाळं असल्याने नेहमीप्रमाणे पोषण आहाराच्या आशेने आलेल्या चिमुकल्यांना बंद दाराचा सामना करावा लागला. अंगणवाडी केंद्राबाहेर हातात रिकाम्या ताटल्या घेऊन बसलेली ही मुले अन्नाच्या प्रतीक्षेत होती.

Maharashtra Anganwadi Sevika Strike News
HSC Exam 2025-26 News : विद्यार्थ्यांनो ऑल द बेस्ट! आजपासून बारावीची परीक्षा, १५ लाखांहून अधिक विद्यार्थी बसणार परीक्षेला

एकीकडे शासकीय दर्जा आणि हक्काच्या वेतनासाठी सेविकांच्या आक्रोश सुरू असताना, दुसरीकडे पोषण आहार न मिळाल्याने लाखो लहान मुले आज पोषक आहारापासून वंचित राहिली आहेत. प्रशासनाने यावर त्वरित तोडगा काढावा, अशी मागणी आता सर्व स्तरातून जोर धरत आहे.

Maharashtra Anganwadi Sevika Strike News
Accident News : लोकल गर्दीचा आणखी एक बळी, बारावीच्या पेपरला जाताना काळाचा घाला; लोकलमधून पडून विद्यार्थ्याचा मृत्यू

अंगणवाडी सेविकांच्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे : -

  • केंद्र सरकारच्या चार श्रम संहिता रद्द करण्यासाठी अंगणवाडी सेविकांची मागणी

  • शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा आणि हक्काच्या वेतनश्रेणीसाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा एल्गार

  • गुजरात उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार सेविकांना २४ हजार ८०० रुपये आणि मदतनीसांना २० हजार ४०० रुपये वेतन देण्याची मागणी

  • मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या कामाचा थकीत मोबदला तातडीने देण्याची मागणी

  • अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मूळ कामाव्यतिरिक्त इतर कामांना जुंपू नका समन्वय समितीचा इशारा

  • सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार ग्रॅच्युटी लागू करा आणि सामाजिक सुरक्षा म्हणून पेन्शन द्या

  • उन्हाळी सुट्टी १५ दिवसांऐवजी १ महिना करा आणि आजारपणाची भरपगारी रजा मंजूर करा

  • FRS मधील तांत्रिक अडचणी दूर करा आणि 5 जी मोबाईलसह ३ हजार ६०० रुपये रिचार्ज भत्ता द्या

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com