Accident News : लोकल गर्दीचा आणखी एक बळी, बारावीच्या पेपरला जाताना काळाचा घाला; लोकलमधून पडून विद्यार्थ्याचा मृत्यू

Dombivli Soham Katre Local Accident News : १२वीच्या पहिल्याच पेपरला जाताना विद्यार्थ्याचा लोकल ट्रेनमधून पडून मृत्यू. कळवा–मुंब्रा दरम्यान ही दुर्दैवी घटना घडली.
Accident News : लोकल गर्दीचा आणखी एक बळी, बारावीच्या पेपरला जाताना काळाचा घाला; लोकलमधून पडून विद्यार्थ्याचा मृत्यू
Dombivli Soham Katre Local Accident NewsSaam Tv
Published On
Summary
  • १२वीच्या पहिल्या पेपरला जाताना विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू

  • कळवा–मुंब्रा दरम्यान लोकल ट्रेनमधून पडून अपघात

  • मृत विद्यार्थी डोंबिवली येथील रहिवासी

  • घटनेमुळे परिसरात हळहळ, कुटुंबावर दुःखाचा डोंगर

विकास काटे, ठाणे

राज्यभरात १२वीच्या बोर्डाच्या परीक्षा सुरु झाल्या आहेत. अशातच डोंबिवलीतून धक्कादायक घटना समोर आली आहे. आज पहिल्याच पेपरला जाताना तरुणाचा रेल्वेतून पडून मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर विद्यार्थ्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Accident News : लोकल गर्दीचा आणखी एक बळी, बारावीच्या पेपरला जाताना काळाचा घाला; लोकलमधून पडून विद्यार्थ्याचा मृत्यू
Today Horoscope : चॉकलेटसारखं नातं गोड होणार! आजचा दिवस कसा असेल? वाचा १२ राशींचे भविष्य

मिळालेल्या माहितीनुसार, मृत विद्यार्थ्याचे नाव सोहम सचिन कटरे असे आहे. सोहम डोंबिवली येथील रहिवाशी होता. त्याला कळव्यातील मनिषा विद्यालय येथे परीक्षा केंद्र लागले होते.आज १२ वीचा पहिला पेपर असून सोहम पेपर देण्यासाठी घरातून निघाला. मात्र नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते.

Accident News : लोकल गर्दीचा आणखी एक बळी, बारावीच्या पेपरला जाताना काळाचा घाला; लोकलमधून पडून विद्यार्थ्याचा मृत्यू
Shocking : अर्धनग्न असताना रूमचा दरवाजा उघडला, प्रसिद्ध हॉटेलमध्ये स्पा थेरपी सुरू असताना परदेशी महिलेसोबत भयंकर घडलं

कळवा–मुंब्रा रेल्वे स्थानकांच्या दरम्यान प्रचंड गर्दीमुळे सोहमचा धावत्या लोकलमधून तोल गेला आणि तो खाली कोसळला. या दुर्घटनेत सोहमचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना आज सकाळच्या सुमारास घडली. या घटनेनंतर सोहंच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com