Odisha Railway Accident Update: CBI चौकशीनंतर सिग्नल इंजीनिअर कुटुंबासह गायब; ओडिशा रेल्वे अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट

Signal Junior Engineer Missing: ज्या इंजीनिअरच्या घरी चौकशी करत घर सील करण्यात आले तो आपल्या कुटुंबासह बेपत्ता झाला आहे.
Coromandel Express Train Accident Odisha
Coromandel Express Train Accident OdishaSaam TV
Published On

CBI Sealed Engineer House: ओडिशातील ट्रेन अपघाताने संपूर्ण देश हादरला होता. २८८ नागरिकांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला. हा अपघात सिग्नल यंत्रणेमुळे झाल्याचं म्हटलं जात आहे. सीबीआयकडे हे प्रकरण सोपवण्यात आलंय. अशात सीबीआयकडून ज्या इंजीनिअरची चौकशी करण्यात आलाी तो आपल्या कुटुंबासह बेपत्ता झाला आहे. (Latest Marathi News)

ओडिशातील बालासोर अपघाताला वेगळं वळण लागल्याचं दिसत आहे. सीबीआयने या प्रकरणी रेल्वेच्या सिग्नल यंत्रणा विभागातील सोरो सेक्शन सिग्नल जुनियर इंजीनिअरची चौकशी केली. त्यानंतर सोमवारी पुन्हा एकदा सीबीआयचे एक पथक इंजीनिअरच्या घरी पोहचले. मात्र यावेळी घरी कोणीच नव्हते. जुनियर इंजीनिअर आपल्या कुटुंबासह बेपत्ता झाला आहे. त्यामुळे सीबीआयने त्याचे घर सील केले आहे.

Coromandel Express Train Accident Odisha
Mumbai Crime News: प्रेमाचा भयानक अंत! धावत्या रिक्षातच प्रियकराने विवाहित प्रेयसीला संपवलं; मुंबईतील धक्कादायक घटना

६ जूनपासून बालासोर रेल्वे अपघाताच्या चौकशीची सूत्र सीबीआयच्या हाती आली आहेत. या दुर्घृटनेनंतर एक एफआयआर देखील दाखल करण्यात आली आहे. सदर अपघात सिग्नलमधील यंत्रणेत बिघाड अथवा छेडछाड केल्याने झाल्याचं म्हटलं जात आहे. सीबीआयने या प्रकरणी रेल्वे स्टेशनही सील केलं आहे. बहानगा बाजार रेल्वे स्टेशनवर सध्या कोणतीही ट्रेन थांबवण्यात येत नाहीये.

ओडिशा रेल्वे अपघात नेमका कसा आणि का झाला?

प्राथामिक माहितीनुसार, सिग्नलमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे. यामुळे कोरोमंडल एक्स्प्रेस (Coromandel Express Accident) एका बाजूच्या ट्रॅकमध्ये शिरली. ज्याला लूप लाइन म्हणतात. त्यावर काही मीटर पुढे एक मालगाडी उभी होती. वरिष्ठ रेल्वे अधिकार्‍यांनी केलेल्या प्राथमिक तपासानुसार, दोन गाड्या ज्या मार्गावर आदळल्या तो ट्रॅक मोठ्या प्रमाणात गंजलेला होता, त्यामुळे हा इतका भीषण अपघात झाला.

Coromandel Express Train Accident Odisha
Pune Crime News: पुणेकर सावधान! कोयता गँगनंतर रुमाल गँग सक्रिय; रात्रीच्या अंधारात वाहनांची तोडफोड

दरम्यान, बालासोर रेल्वे दुर्घटनेच्या तपासासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. अॅड विशाल तिवारी यांनी ही याचिका दाखल केली असून सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली चौकशी आयोग स्थापन करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे.

या आयोगाने 2 जून 2023 रोजी झालेल्या ओडिशा (Odisha) रेल्वे अपघाताच्या कारणांची अनेक पैलूंवरून चौकशी करावी. सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखालील तज्ञ आयोगाची स्थापना करण्याची मागणीही याचिकेत करण्यात आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com