

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी
स्टेट बँक ऑफ इंडिया ४ दिवस राहणार बंद
कर्मचारी जाणार संपावर
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे.स्टेट बँकेने ग्राहकांना महत्त्वाची सूचना दिली आहे. येत्या काही दिवसांमध्ये बँकेचे काम बंद राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुमचे जर स्टेट बँकेत काही काम असेल तर त्याआधी ही माहिती तुम्हाला असायलाच हवी. स्टेट बँक ऑफ इंडियाचे कर्मचारी संपावर जाणार आहेत. त्यामुळेच बँकेचे काम ठप्प होऊ शकते.
४ दिवस बँका राहणार बंद (State Bank of India Closed for 4 Days)
AISBISF ऑल इंडिया स्टेट बँक ऑफ इंडिया स्टाफ फेडरेशननं कर्मचारी संपाबाबतची माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, २५ आणि २६ मे रोजी स्टेट बँक ऑफ इंडियाचे सर्व कर्मचारी संपावर असणार आहे. बँक कर्मचाऱ्यांचा संप दोन दिवस असणार आहे. त्यानंतर चौथा शनिवार आणि रविवारमुळे बँका बंद असणार आहेत. एकूण ४ दिवस बँका बंद असणार आहेत. दोन दिवस सोमवार आणि मंगळवारी कर्मचारी संपावर असणार आहे. त्यामुळे बँकेचे काम चार दिवस बंद असणार आहे.
स्टेट बँकेचे कर्मचारी संपावर का गेले? (SBI Employees Strike)
AISBISF ने सांगितले, स्टेट बँकेच्या कर्मचाऱ्यांचा हा संप अनेक मुद्द्यांसाठी असणार आहे. कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या, नोकरीच्या अटी, भरतीचे नियम आणि पेन्शनबाबतीतील समस्या यामुळे कर्मचाऱ्यांना त्रास होत आहे. याकडे योग्य लक्ष दिलं जात नाही. पहिल्यांदा झालेले करार अजूनही लागू करण्यात आले नाही. त्यामुळे २ मे रोजी दिलेल्या नोटीसमध्ये इंडस्ट्रीयल डिस्प्यूटस एक्ट 1947 नुसार हा संप करत असल्याचं सांगितलं आहे.
या सेवा राहणार बंद
स्टेट बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या संपामुळे बँकेच्या शाखा बंद असू शकतात. बँक कर्मचारी कामावर उपस्थित राहणार नाहीत. दरम्यान, यामुळे ब्रँचमधील कामांवर परिणाम होईल. बँकेतील कामे होणार नाहीत. यामध्ये चेक जमा करणे, रोख रक्कम देणे ही कामे होणार नाही. परंतु डिजिटल सेवा सुरु राहणार आहेत. तुमची ऑनलाइन कामे होणार आहेत. यामध्ये पैसे ट्रान्सफर करणे, बॅलेन्स चेक करणे या सर्व गोष्टी होणार आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.