Bank Scam: SBI च्या ग्राहकांनो सावधान! तुम्हालाही हा मेसेज आलाय? सेकंदातच होईल अकाऊंट रिकामं

SBI Scam: SBI ने ग्राहकांना बनावट KYC मेसेज करुन त्यांचं खातं रिकामं केलं जातं. तुम्ही यापासून लांब राहिलं पाहिजे. कोणत्याही संशयास्पद लिंकवर क्लिक करणं टाळलं पाहिजे.
SBI Bank Alert
Bank Scamgoogle
Published On

SBI Bank Alert: सध्या सगळ्या गोष्टी डिजीटली केल्या जातात. पेमेंटपासून ते खरेदी यासगळ्याचा यामध्ये समावेश होतो. पण याचाच फायदा घेऊन फसवणूक वाढत चालली आहे. एक धक्कादायक गोष्ट म्हणजे देशातल्या सर्वात मोठ्या बॅंकेने म्हणजे State Bank of India (SBI) ने त्यांच्या ग्राहकांसाठी एक महत्वाचा इशारा दिला आहे. त्यामध्ये बनावट मेसेडच्या माध्यमातून ग्राहकांची बॅंकेची माहिती चोरण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो.

वाढत्या स्कॅममध्ये ग्राहकांना घाईत निर्णय घ्यावा लागतो किंवा त्यांना भाग पाडलं जातं. तसेच त्याचा फायदा घेत त्यांचं खातं रिकामं केलं जातं. यात मेसेमध्ये ग्राहकांना त्यांचे YONO SBI अॅप बंद होणार आहे असं सांगितलं जातं. कारण त्यांचे आधार कार्ड अपडेट नाही असं सांगितलं जातं. मग लगेचच KYC अपडेट करायला सांगिलतं जातं. मग एक लिंक पाठवली त्यावर क्लिक करायला सांगितलं जातं.

SBI Bank Alert
WhatsApp Update : WhatsApp वर चॅटींग करण्यासाठी यापुढे द्यावे लागणार पैसे, नव्या अपडेटमुळे कोणकोणत्या गोष्टी बदलणार?

पुढे APK फाइल डाउनलोड केल्यावर तुमची संपूर्ण लॉनिनची माहिती, बॅंकेचे तपशिल, मोबाईलनंबर डेटा चोरला जातो. हा संपूर्ण एक बनावट प्लान असतो. याने तुमच्या बॅंकेतल्या खात्यातले पैसे काढले जातात.

त्यामुळे SBI ने दिलेल्या माहितीनुसार, कोणत्याही संशयास्पद मेसेजवर किंवा त्यांनी पाठवलेल्या लिंकवर क्लिक करू नका. तसेच बॅंकेचे डिटेल्स कोणत्याही ठिकाणी देऊ नका. डिजिटल बॅंकींगचा वापर करत असलात तरीही, कोणत्याही अॅपवर लॉगिन करु नका. मेसेजवर क्लिक करु नका. तसेच KYC किंवा बॅंकेच्या अपडेट संदर्भातले मेसेज आल्यावर अधिकृत वेबसाईटला किंवा बॅंकेत जाऊन खात्री करुन घ्या. तसेच कोणतेच निर्णय घाईत घेणं टाळा.

SBI Bank Alert
Jio Cheapest Recharge: खुशखबर! Jio चा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लान; वर्षभर वापरा पण किंमती फक्त एवढीच...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com